बोंबला! शेजाऱ्यासोबत पत्नीला रंगेहाथ पकडलं, तरी पतीलाच द्यावा लागला हजारो रूपये दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 12:17 PM2022-09-27T12:17:01+5:302022-09-27T12:18:05+5:30

Pati Patni aur Woh: पतीने आपल्या पत्नीला शेजाऱ्यासोबत बेडरूममध्ये रंगेहाथ पकडलं. पण झालं असं की, उलट पतीलाच 45 हजार रूपये दंड भरावा लागला.

Man caught wife red handed with neighbour husband had to pay so much amount | बोंबला! शेजाऱ्यासोबत पत्नीला रंगेहाथ पकडलं, तरी पतीलाच द्यावा लागला हजारो रूपये दंड

बोंबला! शेजाऱ्यासोबत पत्नीला रंगेहाथ पकडलं, तरी पतीलाच द्यावा लागला हजारो रूपये दंड

Next

Pati Patni aur Woh: अलिकडे लोकांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या अनेक घटना समोर येत असतात. पण एकदा भांडणामुळे नात्यात जी दरी तयार होते, तेव्हा नातं नेहमीसाठी तुटतं. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात एका पतीने आपल्या पत्नीला शेजाऱ्यासोबत बेडरूममध्ये रंगेहाथ पकडलं. पण झालं असं की, उलट पतीलाच 45 हजार रूपये दंड भरावा लागला.

झालं असं की, पतीला त्याच्या पत्नीवर संशय होता. एका राती ती बाहेर गेली असताना त्याने तिचा पाठलाग केला. पत्नी घरातून निघाली आणि शेजाऱ्याच्या घरात गेली. हे बघून पतीचा संशय आणखी वाढला. काही वेळ दरवाज्या बाहेर थांबून त्याने दरवाजा वाजवला. नंतर तो घरात शिरला. 

घरात शिरल्यावर त्याने शेजाऱ्याला विचारलं की, त्याची पत्नी कुठे आहे आणि तो म्हणाला की, ती इथे नाहीये. पण पतीने तर त्याच्या डोळ्यांनी त्याच्या पत्नीला घरात शिरताना पाहिलं होतं. तेव्हा त्याने घरात तिला शोधणं सुरू केलं. त्याने घरातील सगळ्या ठिकाणी तिला शोधलं. पण ती काही सापडली नाही. शेवटी त्याने बेडरूममधील बेडखाली पाहिलं तेव्हा तिथे त्याला पत्नी लपलेली दिसली. तिला तिथे पाहून तो संतापला.

पतीने रागाच्या भरात पत्नीच्या नाकार बुक्की मारली. यादरम्यान शेजारी आला. पण पती त्याच्यावरही धावून गेला. पत्नीला बुक्कीमुळे मार लागला. तिच्या नाकातून रक्त येत होतं. पत्नीने न्यायालयात धाव घेतली आणि केस दाखल केली. पतीसोबतचे सगळे संबंध तोडले. नंतर न्यायालयाने पतीला 45 हजार रूपयांचा दंड ठोठावला. तसेच एक वर्षाचा तुरूंगवासही त्याला सुनावला. ही घटना ब्रिटेनच्या वारिगटनमधील आहे.

Web Title: Man caught wife red handed with neighbour husband had to pay so much amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.