एका दिवसात आले ३९ लाखाचं बिलं, आकडा वाचून तरुणाला शॉक लागायचाच राहिला बाकी...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 02:38 PM2022-04-27T14:38:35+5:302022-04-27T14:38:46+5:30

एकाच दिवसासाठी विजेचं बिल 39 लाख रुपये इतकं आलं (39 Lakhs Electricity Bill For Single Day). हे बिल बघून ग्राहकाला धक्काच बसला आणि तो विचार करू लागला की दिवसभरात इतकी वीज त्याने नक्की कशी वापरली असेल?

Man charged Rs 39 lakhs electricity bill for a single day's worth of electricity A man from the UK received the'shock' of his li | एका दिवसात आले ३९ लाखाचं बिलं, आकडा वाचून तरुणाला शॉक लागायचाच राहिला बाकी...

एका दिवसात आले ३९ लाखाचं बिलं, आकडा वाचून तरुणाला शॉक लागायचाच राहिला बाकी...

Next

वीज किंवा पाणी विभागाने लाखो रुपयांची बिले लोकांच्या घरापर्यंत पोहोचवल्याची अनेक प्रकरणे तुम्ही ऐकली असतील. परंतु बहुतेकदा हे अनेक महिन्यांचं बिल एकदाच आल्यावर होतं. पण एका व्यक्तीसोबत अतिशय अजब घटना घडली. त्याला फक्त एकाच दिवसासाठी विजेचं बिल 39 लाख रुपये इतकं आलं (39 Lakhs Electricity Bill For Single Day). हे बिल बघून ग्राहकाला धक्काच बसला आणि तो विचार करू लागला की दिवसभरात इतकी वीज त्याने नक्की कशी वापरली असेल?

प्रकरण युनायटेड किंगडममधील आहे. इथे पॉल डेव्हिस नावाच्या व्यक्तीसोबत ही घटना घडली आहे. जेव्हा त्याला £40,000 म्हणजेच भारतीय चलनात 39 लाखांचे वीज बिल आले तेव्हा त्याला वाटलं की ही वीज विभागाची चूक आहे. मात्र, इलेक्ट्रॉनिक मीटर कधीही चुकू करू शकत नाही, असं खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानं डेव्हिस आणखीनच हैराण झाला.

युनायटेड किंगडममधील स्कंथॉर्प येथील डेव्हिसच्या घरी केवळ एका दिवसाचं वीज बिल आलं तेव्हा तो चक्रावून गेला. त्याला मीटर बंद करून तो कपाटात झाकून ठेवावा लागला. 46 वर्षीय डेव्हिडने वीज विभागाला मीटरमधील बिघाडाबद्दल सांगितलं तेव्हा पुरवठादाराने सांगितलं की मीटरमध्ये कोणताही दोष असू शकत नाही. मीटरच्या सॉफ्टवेअरमधील त्रुटीबाबत डेव्हिडने कंपनीकडे सातत्याने तक्रार केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

बर्‍याच चर्चेनंतर अखेर कंपनीने सॉफ्टवेअरच्या समस्येमुळं वीज बिल इतकं जास्त आल्याचं मान्य केलं. या तक्रारीबाबत वीज विभागाचं वर्तनही अत्यंत वाईट असल्याचं डेव्हिसचं म्हणणं आहे. पूर्वी दरमहा बिल £400 च्या रीडिंगनुसार येत असं, पण जेव्हा £40,000 म्हणजेच 39 लाख रुपये एका दिवसाचं बिल आलं तेव्हा वीज विभागाने आपली चूक मान्य केली. कारण संपूर्ण परिसराला लागेल इतकी वीज कोणी एकच व्यक्ती खर्च करू शकत नाही! या घटनेनंतर कंपनीने याची दखल घेत मीटर बदलला.

Web Title: Man charged Rs 39 lakhs electricity bill for a single day's worth of electricity A man from the UK received the'shock' of his li

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.