नशीबवान! ट्रक साफ करताना कचऱ्यात असं काही सापडलं की रातोरात 'तो' झाला लखपती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 12:24 PM2024-03-08T12:24:08+5:302024-03-08T12:30:24+5:30

एका व्यक्तीला ट्रक साफ करताना कचऱ्यात असं काही सापडलं ज्यामुळे रातोरात त्याचं नशीब फळफळलं आहे.

man cleaning truck finds months old mega millions ticket made him win 25 lakh rupees | नशीबवान! ट्रक साफ करताना कचऱ्यात असं काही सापडलं की रातोरात 'तो' झाला लखपती

प्रातिनिधिक फोटो

कोणाचं नशीब कसं आणि कधी फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला ट्रक साफ करताना कचऱ्यात असं काही सापडलं ज्यामुळे रातोरात त्याचं नशीब फळफळलं आहे. व्यक्तीला मेगा मिलियन्स लॉटरीचं तिकीट सापडलं होतं. त्याने ते आधी विकत घेतलं होतं पण नंतर तो लॉटरीचं तिकीट घेतल्याचं विसरला होता. 

व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने 6 ऑक्टोबर 2023 च्या मेगा मिलियन्स ड्रॉइंगसाठी कॅरोलिन काउंटीमधील हार्मनी रोडवरील रॉयल फार्म्स स्टोअरमधून काही तिकिटे खरेदी केली आहेत. अनेक महिने ही तिकिटे ट्रकमध्ये पडून होती आणि तो विसरलाही होता. त्याने तिकीट फेकून देण्यापूर्वी एकदा ते चेक करण्याचा निर्णय घेतला. 

जेव्हा तिकीट तपासलं तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला कारण एका तिकिटावर 30,000 डॉलर म्हणजेच 25 लाख रुपये जिंकले होते. नंतर त्याने त्यावर दावा केला आणि बक्षीस मिळवले. मी माझं बिल भरण्यासाठी आणि माझ्या रिटायरमेंटची गुंतवणूक करण्यासाठी हे पैसे वापरण्याची योजना आखत असल्याचं म्हटलं आहे. 

काही काळापूर्वी व्हर्जिनियातील एका महिलेसोबत असंच काहीं घडलं होतं. जेनेट बॅन नावाच्या महिलेने एका छोट्या जनरल स्टोअरमधून पिण्यासाठी सोड्याची बॉटल विकत घेतली. त्यानंतर तिने दुकानात ठेवलेलं स्क्रॅच-ऑफ लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. नंतर, जेव्हा तिला कळलं की तिच्या तिकिटावर $100,000 (रु. 83 लाख) बक्षीस आहे, तेव्हा तिला धक्काच बसला. 
 

Web Title: man cleaning truck finds months old mega millions ticket made him win 25 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा