बोंबला! पैसे-दागिने नाही तर फक्त चोरायचा महिलांच्या वापरलेल्या चपला; कारण वाचून पोलिसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 03:14 PM2021-07-08T15:14:32+5:302021-07-08T15:20:36+5:30
या चोराने ज्या वस्तू चोरल्या त्या पाहून पोलिसही चक्रावले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर चोरानं जे कारण सांगितलं त्यानं पोलिसही थक्क झाले.
चोर कधी कशाची चोरी करतील याचा काही नेम नाही. जपानमध्ये एका विकृत चोराला पकडण्यात आलं आहे. सामान्यपणे चोर पैशांची-दागिन्यांची चोरी करत असतात. पण हा चोर फारच विचित्र वस्तूंची चोरी करत होता. या चोराने ज्या वस्तू चोरल्या त्या पाहून पोलिसही चक्रावले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर चोरानं जे कारण सांगितलं त्यानं पोलिसही थक्क झाले.
जपानमधील (Japan) मुरकामी (Murakami) इथं राहणाऱ्या या चोराला पोलिसांनी १० जून रोजी महिलांच्या वापरलेल्या चपला आणि बूट चोरल्याबद्दल अटक केली होती. हा ४७ वर्षीय चोर एका ऑफिसमध्येही काम करायचा आणि संधी मिळताच महिलांनी वापरलेल्या चपला आणि बूट चोरून न्यायचा. पोलिसांना त्याच्या घरातून १३९ चप्पल आणि बुटाचे जोड सापडले आहेत. (हे पण वाचा : गर्लफ्रेन्डच्या वडिलांनी रंगेहाथ पकडलं, तरूणाने विना कपडे १३व्या मजल्यावरून मारली उडी आणि...)
त्सुनेहिटो इसोबे असं या चोराचं नाव असून चप्पल आणि बूट चोरताना तो सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. त्यानं चोरलेल्या सँडलची किंमत ५०० येन होती. मुराकामी भागातील कार्यालयामधून वारंवार महिलांची पादत्राणे गायब होत असल्यानं तिथं कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यात हा चोर दिसला.
आश्चर्याची बाब म्हणजे याआधीही या चोराला चपला चोरण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. तेव्हा त्याच्याकडे महिलांच्या पादत्राणाच्या २०० जोड्या सापडल्या होत्या. तुरुंगातून सुटल्यानंतर ७ वर्षाच्या आत त्यानं पुन्हा १३९ जोड्या चोरल्या होत्या. (हे पण वाचा : अरे देवा! टॉयलेट सीटवर बसताच सापाने व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला मारला दंश आणि मग.....)
काय होतं कारण?
यावेळी पोलिसांनी इसोबेची चौकशी केली असता त्याने सांगितलं की, लहानपणापासूनच त्याला महिलांनी वापरलेल्या केलेल्या चप्पल, बुटांचं आकर्षण वाटत होतं. बर्याच वर्षांपासून तो महिलांनी वापरलेल्या पादत्राणांची चोरी करत आहे. कारण त्याला त्याचा वास आवडतो. या वासानं त्याला लैंगिक समाधान (Sexual Desires) मिळते. हा आनंद पुन्हा पुन्हा मिळवण्याच्या उद्देशानं तो वारंवार महिलांची पादत्राणे चोरत असे.