आयडियाची कल्पना! उन्हाळ्यासाठी भन्नाट देसी जुगाड; पाण्याच्या ड्रमपासून बनवला स्टायलिश Cooler
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 05:43 PM2022-03-09T17:43:11+5:302022-03-09T17:50:20+5:30
Video Viral : उन्हाळ्यात थंड हवा मिळवण्याचा एक मस्त जुगाड केला आहे.
नवी दिल्ली - सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ हे जोरदार व्हायरल होत असतात. यामधले अनेक व्हिडीओ हे देसी जुगाड दाखवणारे असतात. असाच एक हटके देसी जुगाड दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जेव्हा एखादे काम अवघड किंवा अशक्य असते तेव्हा लोक काहीतरी जुगाड करून त्यांचे काम सोपे करतात. कधी कधी या जुगाडाची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. गरमीपासून वाचण्यासाठी पाण्याच्या ड्रमपासूनच स्टायलिश कूलर बनवण्याची घटना समोर आली आहे.
तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने उन्हाळा येण्याआधीच शक्कल लढवली आहे. उन्हाळ्यात थंड हवा मिळवण्याचा एक मस्त जुगाड केला आहे. त्या व्यक्तीने घरात पडलेल्या पाण्याच्या ड्रमपासून कूलर बनवला आहे. व्हिडीओमध्ये दिसत की पाण्याचा निळ्या रंगाचा प्लास्टिकचा ड्रम आहे, ज्यामध्ये त्या व्यक्तीने एग्जॉस्ट लावून त्याला कूलर बनवला. याशिवाय थंड हवेसाठी टाकीत गवतही बसवले.
हा कूलर जुगाडपासून बनवला असला तरी तो दिसायला एकदम स्टायलिश दिसतो. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर desijugad7 नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा जुना व्हिडीओ असून पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांना तो आवडला असून काहींनी त्याचं भरभरून कौतुक केलं आहे. याआधी देखील असेच काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.