CoronaVirus News: कोरोनामुळे मृत्यूमुखी पडला, ७ मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला; मृत्यूनंतरचा थरारक अनुभव सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 06:06 PM2021-05-16T18:06:45+5:302021-05-16T18:08:36+5:30

CoronaVirus News: मृत्यूनंतर नेमकं काय होतं, या सगळ्यांना पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर एका माणसाला मिळालंय..

man died of covid 19 for few minutes shares after death experience | CoronaVirus News: कोरोनामुळे मृत्यूमुखी पडला, ७ मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला; मृत्यूनंतरचा थरारक अनुभव सांगितला

CoronaVirus News: कोरोनामुळे मृत्यूमुखी पडला, ७ मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला; मृत्यूनंतरचा थरारक अनुभव सांगितला

Next

ब्युनोस एरिस: मृत्यूनंतर नेमकं काय घडतं? माणसाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतात. पण त्याच्या मनाचं काय? मृत्यूनंतर मानवी मनात नेमकी काय घडतं असतं? मानवी मनाची अवस्था त्यावेळी कशी असते? जगभरातील कोट्यवधी लोकांना त्यांच्या आयुष्यात हा प्रश्न अनेकदा पडला आहे. आयुष्य संपल्यानंतर काय होत असेल याचा विचार माणूस आयुष्यभर करतो. मात्र आयुष्य संपूनही त्याचं उत्तर मिळत नाहीत. मात्र एका व्यक्तीला या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.

हृदयद्रावक! ९ वर्षांनी घरी पाळणा हलला; पण अवघ्या १५ दिवसांत आई-वडिलांचा कोरोनानं मृत्यू

मरणानंतर नेमकं काय होतं याचं उत्तर अर्जेंटिनात राहणाऱ्या ६४ वर्षीय मॅकेनिक नॉर्बेर्टोनं दिलं आहे. गेल्या वर्षी नॉर्बेर्टो यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती हळूहळू बिघडत गेली. त्यानंतर त्यांना क्लिनिकली डेड घोषित करण्यात आलं. मात्र सात मिनिटांनंतर त्यांचा श्वास सुरू झाला. आता नॉर्बेर्टो यांनी त्यावेळी त्यांना आलेला अनुभव, मृत्यूनंतर पाहिलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत.

भयंकर, भयानक, भयावह! गंगा नदीच्या किनारी वाळूत पुरण्यात आले शेकडो मृतदेह

नॉर्बेटो मार्च २०२० पासून घरीच होते. ते घरी राहूनच वाहनं दुरुस्त करायचे. मात्र तरीही त्यांना कोरोनाची लागण झाले. कोरोनामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. काही दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. घरी गेल्यावर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांना प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली. नॉर्बेर्टो यांना दोन जणांसह एका वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. मात्र त्या दोघांचा मृत्यू झाला. दोघांचा मृत्यू पाहिल्यानं त्यांची प्रकृती बिघडली.

नॉर्बेर्टो यांचा श्वासोच्छवास कमी कमी होत गेला. त्यानंतर नॉर्बेर्टो यांचा श्वास थांबला. मात्र डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. त्यामुळे नॉर्बेर्टो यांचा श्वास पुन्हा सुरू झाला. या वेळात आलेला अनुभव नॉर्बेर्टो यांनी सांगितला आहे. 'मी त्यावेळी एका बोगद्यात होतो. त्या बोगद्याच्या शेवटी प्रकाश दिसत होता. मी अनेक चित्रपटांमध्ये अशा प्रकारची दृश्यं पाहिली होती. मृत्यूनंतरही मला तशीच दृश्यं दिसू लागली,' असं नॉर्बेर्टो यांनी सांगितले. ते अनेक महिने रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. आता ते आजारपणातून बरे होत आहेत.

Web Title: man died of covid 19 for few minutes shares after death experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.