2 मिनिटात तो प्यायला पचनाचं बॉटलभर औषध, शंभर रूपयांच्या पैजेसाठी गमवावा लागला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 12:43 PM2022-07-13T12:43:58+5:302022-07-13T12:44:46+5:30
South Africa : ही जीवघेणी पैजेची घटना साऊथ आफ्रिकेतील एलिमच्या माशबामधून समोर आली आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू पोटाचं औषध असलेली बॉटल पिण्याने झाला होता.
मित्रांमध्ये गंमत सतत सुरू असते. मित्र एकमेकांना वेगवेगळी अजब चॅलेंजेसही देत असतात. काही चॅलेंज मजेदार असतात तर काही जीवघेणे ठरतात. साऊथ आफ्रिकेतील एका व्यक्तीसोबत त्याच्या मित्रांनी एक जीवघेणी पैज लावली. या व्यक्तीला अन्न पचवणारं औषध दोन मिनिटांमध्ये प्यायचं होतं. जर तो ही पैज जिंकला असता तर त्याला 100 रूपये मिळाले असते. व्यक्तीने पैज जिंकली सुद्धा. पण पैजेचे 100 रूपये घेण्यासाठी तो जिवंत वाचला नाही.
ही जीवघेणी पैजेची घटना साऊथ आफ्रिकेतील (South Africa) एलिमच्या माशबामधून समोर आली आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू पोटाचं औषध असलेली बॉटल पिण्याने झाला होता. या व्यक्तीला पूर्ण बॉटल 2 मिनिटांमध्ये संपवायची होती. या व्यक्तीचं वय 25 ते 30 सांगण्यात आलं. या व्यक्तीचा मृत्यू ब्लूड कॉर्नर कार वॉश अॅन्ड लिक्वर रेस्टॉरन्टमध्ये झाला. तिथे बसूनच त्याने औषधाची बॉटल संपवली होती. ही जीवघेणी पैज त्याच्या मित्रांनीच त्याच्यासोबत लावली होती. तर पैजेचं बक्षीस 100 रूपये होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना 10 जुलैची आहे. रात्री साधारण 11 वाजता व्यक्तीचा रेस्टॉरन्टमध्ये मृत्यू झाला. त्याने त्याच्या मित्रांसोबत 100 रूपयांची पैज लावली होती. या पैजेत व्यक्तीला Jägermeister नावाचं अन्न पचनाचं औषध 2 मिनिटांमध्ये प्यायचं होतं. या बॉटलमध्ये 35 टक्के अल्कोहोल असतं. व्यक्तीने दोन मिनिटात ते संपवलं. पण बॉटल संपताच त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्याला चक्कर येऊ लागले होते. त्यानंतर त्याला मित्रांनी खाली बसवलं.
औषध संपल्यावर त्याची तब्येत बिघडली होती. ज्याच्यामुळे नंतर त्याचा मृत्यू झाला. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. सोबतच प्रकरणाची चौकशी सुरू केली. ही पैज गावातीलच एका रेस्टॉरन्टमध्ये लावली गेली होती. ज्यात विजेत्याला 100 रूपये मिळणार होते. पण औषध पिताच त्याचा मृत्यू झाला आणि तो पैजेचे पैसेही घेऊ शकला नाही.