जोश जोशमध्ये केला असा कारनामा, दारूसोबत वायग्राच्या गोळ्या खाल्ल्या आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 11:00 AM2023-03-07T11:00:16+5:302023-03-07T11:01:17+5:30
दोघेही आधी दारू प्यायले आणि त्यानंतर व्यक्तीने वायग्राच्या दोन गोळ्याही दारूत टाकून दारू प्यायला. नंतर काय झालं माहीत नाही, पण सकाळी त्याचा मृतदेह हॉटेलच्या रूममध्ये आढळून आला.
वायग्राचा वापर अलिकडे खूप जास्त व्हायला लागला आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करणं महागात पडू शकतं. एका कपलने आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करताना मोठा कारनामा केला. दोघे इतके उत्साही होते की, त्यांच्यासोबत दुर्घटना झाली. दोघेही आधी दारू प्यायले आणि त्यानंतर व्यक्तीने वायग्राच्या दोन गोळ्याही दारूत टाकून दारू प्यायला. नंतर काय झालं माहीत नाही, पण सकाळी त्याचा मृतदेह हॉटेलच्या रूममध्ये आढळून आला.
ही घटना नागपूरची आहे. या घटनेबाबतचा एक रिपोर्ट जर्नल ऑफ फॉरेंसिक अॅंड लीगल मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला. रिपोर्टनुसार, रात्री व्यक्तीने सिल्डेनाफिलच्या 50 मिली ग्रामच्या दोन गोळ्या दारूसोबत गिळल्या. सकाळी तो उठला तर त्या अस्वस्थता जाणवली. त्याला चक्कर आली आणि तो पडला. नंतर त्याला उलटी झाली. महिलेने डॉक्टरला बोलवण्यास सांगितलं तर त्याने नकार दिला. म्हणाला की, आधीही त्याला असं झालं होतं. पण काही वेळातच त्याची स्थिती आणखी बिघडली. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
डॉक्टरांनी सांगितलं की, वाययग्रामुळे त्याचं ब्लड प्रेशर अनियंत्रित झालं होतं आणि सेरेब्रोवास्कुलर रक्तस्रावामुळे त्याचा जीव गेला. यात मेंदूलाही ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला होता. त्याच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण 0.186 आढळून आलं. पोस्टमॉर्टम स्कॅनमध्ये मेंदूजवळ 300 ग्रामची रक्ताची गाठ दिसून आली.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, सिल्डेनाफिलचा वापर पुरूष आपली लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी करतात. पण याचे धोकेही अनेक आहेत. सिल्डेनाफिल आणि अल्कोहोलचं सोबत सेवन केलं तर ब्लड प्रेशर वाढतं. कधी कधी यात लोकांचा जीवही जातो. स्ट्रोकचाही धोका असतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एकावेळी एकपेक्षा जास्त गोळी खाऊ नये. वायग्राचा वापर केवळ पुरूषांनीच करावा.