शारीरिक संबंध ठेवताना व्यक्तीचा मृत्यू; परमोच्च आनंद मिळणं ठरलं जीवघेणं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 11:12 AM2021-01-28T11:12:05+5:302021-01-28T11:18:09+5:30
शरीरविक्रय करणाऱ्या महिलेसोबत संबंध ठेवताना व्यक्तीचा मृत्यू
शरीरसंबंध ठेवताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आफ्रिका खंडातील मालावी देशात घडली आहे. देहविक्रय करणाऱ्या महिलेसोबत शरीरसंबंध ठेवत असताना हा प्रकार घडला. शारीरिक संबंधांवेळी परमोच्च आनंद मिळाल्यानं व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली.
पोलिसांनी नोंद केलेल्या माहितीनुसार चार्ल्स मजावा असं मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याचं वय ३५ वर्षे होतं. देहविक्रय करणाऱ्या महिलेसोबत शरीरसंबंध ठेवत असताना चार्ल्स मजावा बेशुद्ध पडले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला. डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, देहविक्रय करणाऱ्या या घटनेची माहिती तिच्यासोबत काम करणाऱ्या महिलांना दिली. त्यानंतर घडलेला प्रकार पोलिसांना सांगण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मिगोवी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय निरीक्षकांनी शवविच्छेदन केलं. शरीरसंबंधावेळी परमोच्च सुख मिळाल्यानं चार्ल्स यांचा मृत्यू झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून समोर आली. परमोच्च आनंद मिळाल्यानं मेंदूतील रक्तवाहिन्यांना धक्का बसल्यानं चार्ल्स यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. चार्ल्स यांच्या मृत्यूसाठी पोलिसांनी देहविक्रय करणाऱ्या महिलेला जबाबदार धरलेलं नाही. तिच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.