फेक डिलिवरी बॉय बनून लंपास केली १६ लाखांची दारू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 12:22 PM2019-12-04T12:22:14+5:302019-12-04T12:23:08+5:30
अक्षय कुमारचा 'स्पेशल २६' हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आठवत असेल. यात एक टीम खोटे इन्कम टॅक्स अधिकारी बनून एक ज्वेलरी शॉप लुटतात.
अक्षय कुमारचा 'स्पेशल २६' हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आठवत असेल. यात एक टीम खोटे इन्कम टॅक्स अधिकारी बनून एक ज्वेलरी शॉप लुटतात. अशीच एक घटना ब्रिटनमधून समोर आली आहे. पण इथे एकाच व्यक्तीने मोठा हात मारलाय. ब्रिटनच्या लिव्हरपूलमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे एक व्यक्ती फेक डिलिवरी बॉय बनून गेला आणि एका घरातून तो ३ हजार व्हिस्कीच्या बॉटल घेऊन लंपास झाला. या ३ हजार व्हिस्कीच्या बॉटल्सची किंमत १८ हजार यूरो म्हणजे भारतीय करन्सीनुसार ही किंमत १६ लाख रूपये इतकी होते.
या व्यक्तीने McBurney Transport चा फेक डिलिवरी बॉय बनून व्हिस्कीच्या महागड्या बॉटल चोरी केल्या. त्याने डून्स वे Kirkdale मधून या बॉटल्सची चोरी केली. ही घटना २५ नोव्हेंबरला घडली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चोराने एक हॅट घातली होती. सोबतच त्याने हाय व्हीएलएस जॅकेटही घातलं होतं. ज्यामुळे त्याच्यावर कुणालाही संशय आला नाही आणि तो आरामात दारूच्या बॉटल घेऊन पसार झाला.
(Image Credit : snopes.com)
आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीने ही चोरी एकट्याने केली. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत असून त्यांचं मत आहे की, चोर फारच हुशार आहे. ते म्हणाले की, जी दारू चोरी केली गेली ती मार्केटमध्ये ब्लॅकने विकली जाऊ शकत नाही. चोराची माहिती मिळवण्यासाठी सीसीटीव्ह फुटेज चेक केलं जात आहे.