टॉयलेट सीटवर बसणार इतक्यात दिसला खतरनाक साप आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 10:51 AM2022-09-20T10:51:01+5:302022-09-20T10:52:19+5:30
Snake Attack: सापाला टॉयलेटमध्ये पाहिल्यानंतर व्यक्तीने मदत मागितली. त्यानंतर पोलिसांची एक टीम त्यांच्या घरी पोहोचली. यानंतर पोलीस विभागाने आपल्या अधिकृत पेजवर टॉयलेटमधील सापाचे फोटो एका पोस्टसोबत शेअर केले.
Snake Attack: जरा कल्पना करा की, तुम्ही टॉयलेटला गेले आणि तिथे तुम्हाला खतरनाक साप दिसला तर....? अशीच एक घटना अमेरिकेच्या अलबामामधून समोर आली आहे. इथे एका परिवारातील सदस्य टॉयलेटमध्ये गेला आणि टॉयलेट सीटच्या आत त्याला एक खतरनाक साप दिसला. त्याने बारकाईने पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, हा एक ग्रे रॅट स्नेक आहे. त्यानंतर परिवाराने पोलिसांना बोलवलं.
सापाला टॉयलेटमध्ये पाहिल्यानंतर व्यक्तीने मदत मागितली. त्यानंतर पोलिसांची एक टीम त्यांच्या घरी पोहोचली. यानंतर पोलीस विभागाने आपल्या अधिकृत पेजवर टॉयलेटमधील सापाचे फोटो एका पोस्टसोबत शेअर केले. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आम्हाला अजिबात माहीत नसतं की, आमच्या शिफ्ट दरम्यान आम्हाला कशाप्रकारचा कॉल येऊ शकतो. आम्हाला जो फोन आला ती घटना ऐकून आम्ही हैराण झालो. टॉयलेटमध्ये एक साप आढळून आला होता. डे शिफ्टमधील लोक त्यांच्या मदतीसाठी गेले आणि त्यांना सापाला रेस्क्यू केलं. सापाला जंगलात सुरक्षित सोडण्यात आलं आहे'.
पोलीस विभागाच्या या पोस्टला हजारो लाइक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेक यूजर या घटनेबाबत वाचून हैराण झाले. ते म्हणाले की, नेक्स्ट टाइम जेव्हा टॉयलेटला जाल तर आधी लाइट सुरू कराल. एका यूजरने लिहिलं की, 'मी रात्री लाइट ऑन करून आधी टॉयलेट चेक करतो'. तर एकाने लिहिलं की, 'जर हे माझ्यासोबत झालं असतं तर मी बेशुद्ध झालो असतो'.