कचऱ्यात सापडलं वडिलांचं जुनं बॅंक पासबुक, रातोरात कोट्याधीश बनला मुलगा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 02:37 PM2024-10-29T14:37:19+5:302024-10-29T14:40:32+5:30
चिलीमध्ये राहणारे एक्सिकेल हिनोजोसा आपल्या घरात सफाई करत होते. तेव्हा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात त्यांना वडिलांचं ६० वर्ष जुनं पासबुक सापडलं.
कुणाचं नशीब कधी आणि कसं चमकेल काहीच सांगता येत नाही. कधी कधी तर कल्पनाही केली नसेल अशाप्रकारे लोकांचं नशीब चमकलं आहे. याचं नुकतंच एक उदाहरण समोर आलं आहे. एका व्यक्तीला कचऱ्यात कोट्यावधी रूपयांचा खजिना सापडला. यात काही सोनं किंवा हिरे नाही तर त्याला त्याच्या वडिलांचं ६० वर्ष जुनं बॅंक पासबुक सापडलं. या पासबुकच्या माध्यमातून व्यक्ती कोट्याधीश झाली आहे.
चिलीमध्ये राहणारे एक्सिकेल हिनोजोसा आपल्या घरात सफाई करत होते. तेव्हा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात त्यांना वडिलांचं ६० वर्ष जुनं पासबुक सापडलं. या बॅंक खात्याबाबत त्यांच्या वडिलांशिवाय कुणालाही माहिती नव्हती. तर त्यांच्या वडिलांचं निधन १० वर्षाआधीच झालं होतं.
एक्सिकिलच्या वडिलांनी 1960-70 मध्ये घर खरेदी करण्यासाठी एका बॅंकेत जवळपास 1.40 लाख पेसोस (चिली करन्सी) जमा केले होते. त्याची सध्याची व्हॅल्यू 163 डॉलर आहे. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम 13,480 रूपये इतकी होते.
व्यक्तीने लगेच बॅंकेला याची सूचना दिली. पण त्याचा आनंद लगेच गायब झाला.
मुळात ही बॅंक खूप आधीच बंद झाली होती. पण पासबुकवर स्टेट गॅरंटीड असा शब्द दिसला. याचा अर्थ असा होतो की, जर बॅंकेने पैसे दिले नाही तर सरकार पैसे देणार.
नंतर या व्यक्तीने लगेच सरकारसोबत संपर्क केला. पण तिथेही काही झालं नाही. अशात व्यक्तीने कोर्टाकडे न्याय मागितला. कोर्टात सरकारविरोधात केस दाखल केली. त्यानी कोर्टात सांगितलं की, हे पैसे त्यांच्या वडिलांच्या मेहनतीची कमाई आहे. सरकारने ते परत देण्याचं आश्वासन दिलं होतं.
व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने सरकारला व्याजासहीत आणि महागाई भत्त्यासोबत व्यक्तीला १ बिलियन पेसो म्हणजे १.२ मिलियन डॉलर परत करण्याचा आदेश दिला. मात्र, सरकारने खालच्या कोर्टात या निर्णयाला आव्हान दिलं. सध्या यावर काही अपडेट नाही. जर निर्णय सरकारविरोधात आला तर व्यक्तीला साधारण १० कोटी रूपये मिळू शकतील.