घराची सफाई करताना सापडला मौल्यवान 'खजिना', विकून मालामाल होणार परिवार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 10:30 AM2023-06-14T10:30:32+5:302023-06-14T10:33:16+5:30

जॉन यांनी सांगितलं की, घरात हे सगळं सापडल्यानंतर मला काही क्वाइन कलेक्टर्स आणि जुन्या वस्तुंच्या एक्सपर्ट्सने संपर्क केला.

Man finds one million pennies cleaning out home los angles America | घराची सफाई करताना सापडला मौल्यवान 'खजिना', विकून मालामाल होणार परिवार!

घराची सफाई करताना सापडला मौल्यवान 'खजिना', विकून मालामाल होणार परिवार!

googlenewsNext

घराची साफसफाई किंवा खोदकाम करताना जर तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू कंवा खजिना सापडला तर अर्थातच आनंद होणार. नुकतीच एका परिवारासोबत अशीच एक घटना घडली. आपल्या घराची सफाई करत असताना या परिवाराला पैशांनी भरलेल्या काही बॅग्स सापडल्या. यात साधारण 10 वर्ष जुनी नाणी सापडलीत. ही नाणी सापडलेले जॉन रेयेस म्हणाले की, त्यांना त्यांच्या सासऱ्याच्या जुन्या घराची सफाई करताना ही नाणी सापडली. ही सीलबंद बॅंक बॅगमध्ये होती.

ही घटना अमेरिकेतील लॉस एंजलिसमधील आहे. जॉन यांनी सांगितलं की, घरात हे सगळं सापडल्यानंतर मला काही क्वाइन कलेक्टर्स आणि जुन्या वस्तुंच्या एक्सपर्ट्सने संपर्क केला. त्यांनीच सांगितलं की, ही नाणी कमीत कमी 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जुनी आहेत. रेयेसने फॉक्स 11 ला सांगितलं की, काही क्वाइन कलेक्टर्स म्हणाले की, ही नाणी तोपर्यंत विकली जाऊ नये जोपर्यंत त्यांच्याबाबत पूर्ण माहिती मिळत नाही.

न्यूयॉर्क पोस्टनुसार, परिवाराने सांगितलं की, त्यांना सापडलेली नाणी ही तांब्याची आहेत. जी संयुक्त राज्य अमेरिकेने 1980 च्या दशकात बदलली होती. यावरून अंदाज लावला जात आहे की, ही नाणी 40 वर्ष जुनी आहेत. तेच रेयेसने 20 लाख रूपयांची मागणी करत ही नाणी एका रीसेल वेबसाइटवर लिस्ट केली आहे.

दरम्यान गेल्या महिन्यातही अशीच एक घटना समोर आली होती. इथे घराचं काम करत असलेल्या व्यक्तीच्या हाती खजिना लागला होता. त्याला साधारण 50 लाख रूपये सापडले होते. पण या पैशांचा तो वापर करू शकला नाही. त्याने याबाबतचं कारण सांगितलं होतं. ही घटना स्पेनच्या लुगो सिटीमधील आहे.

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, तोनो पायनिरो नावाच्या व्यक्तीने उत्तर-पश्चिम स्पेनमध्ये एक घर खरेदी केलं होतं. ज्यावेळी तो घराचं काम करत होता तेव्हा त्याला एका भींतीमागे एक कपाट दिसलं, ते त्याने चेक करत तर तो थक्क झाला. कारण त्यात 48 लाख 14 हजार रूपयांच्या नोटा होत्या. पण त्याचा हा आनंद काही काळच टिकला. कारण त्याला नंतर समजलं की, जे स्पॅनिश करन्सी त्याला घराच्या मलब्यात सापडली ती आता चलनात नाही. ती 2022 मध्ये बंद करण्यात आली. 

Web Title: Man finds one million pennies cleaning out home los angles America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.