‘टक्कल’ पडले म्हणून कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढले; कोर्टाने Boss ला दिला 440 व्होल्टचा झटका..!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 05:47 PM2023-02-13T17:47:29+5:302023-02-13T17:47:56+5:30
कोर्टाने त्या कर्मचाऱ्याला 70 लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.
Man Fired For Being Bald: कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढण्यासाठी बॉस वेगवेगळी कारणे देतात. यातच टक्कल पडल्यामुळे एका माणसाला नोकरीवरून काढून टाकल्याचा प्रकार समोर आला आले. वाचून विचित्र वाटेल, पण ही खरी घटना आहे. हे प्रकरण कोर्टात पोहोचले, जिथे निर्णय कर्मचाऱ्याच्या बाजूने आणि प्रदीर्घ लढाईनंतर त्याला 70 लाखांहून अधिकची भरपाई मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्क जोन्सला टँगो नेटवर्कच्या डायव्हर्सिटी कंपनीतून त्याच्या बॉस फिलिप हेस्केथने काढून टाकले होते. आपल्या टीममध्ये कोणत्याही टकल्या माणसाला ठेवायचे नाही, असे सांगून त्याला काढले. विशेष म्हणजे, तो स्वतः टकला आहे आणि त्याला स्वतःसारखा व्यक्ती नको होता, म्हणून त्याने मार्कला काढले. मार्क त्या कंपनीत 60 हजार पौंड (सुमारे 60 लाख रुपये) वार्षिक पॅकेजवर काम करायचा.
मार्कला नोकरीवरुन काढण्यासाठी डोक्यावरील केसांसह इतरही काही कारणे सांगण्यात आली. नोकरीवरुन काढल्यानंतर मार्कने कोर्टाची दारे ठोठावली. 18 डिसेंबर 2020 पासून मार्क जोन्सची कंपनीविरुद्ध कायदेशीर लढाई सुरू होती. प्रदीर्घ लढाईनंतर कोर्टाचा निकाल मार्कच्या बाजूने लागला आणि कोर्टाने कंपनीला मार्कला 70 लाखांहून अधिकची नुकसान भरपाई देण्यास सांगितले.