जमिनीत गाडलेला सापडला 400 वर्ष जुना खजिना, एका झटक्यात चमकलं नशीब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 02:55 PM2023-03-08T14:55:20+5:302023-03-08T14:56:18+5:30
Treasure : आपलं पूर्ण आयुष्य मुलांच्या शिक्षणासाठी घालवल्यानंतर 71 वर्षीय रिचर्ड मॅककाइ यांना त्यांच्या फार्म हाऊसमध्ये खजिना सापडला. हा खजिना म्हणजे एक अंगठी आहे.
Treasure : अनेकदा आपल्याला अशा काही वस्तू सापडतात ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं. घरात बसल्या बसल्या त्याच्या हाती खजिना लागला. इंग्लॅंडच्या Braunton मध्ये राहणारी एक वृद्ध व्यक्त आपल्या जुन्या फार्म हाऊसमध्ये होती. तेव्हा त्यांना हा शेकडो वर्ष जुना खजिना सापडला. त्यांना माहीत होतं की, त्यांना एक बहुमूल्य वस्तू सापडली, पण त्याचं महत्व त्यांना माहीत नव्हतं.
आपलं पूर्ण आयुष्य मुलांच्या शिक्षणासाठी घालवल्यानंतर 71 वर्षीय रिचर्ड मॅककाइ यांना त्यांच्या फार्म हाऊसमध्ये खजिना सापडला. हा खजिना म्हणजे एक अंगठी आहे. जी साधारण 400 वर्ष जुनी आहे. अंगठी फार महागडी आहे आणि त्यावर त्यावेळची डिझाइनही आहे. त्यांना ही अंगठी 2012 मध्ये सापडली होती. तेव्हा ते बागेची साफ सफाई करत होते.
द सनच्या रिपोर्टनुसार, जेव्हा त्यांना ही अंगठी सापडली तेव्हा ते फार खूश झाले. त्यांना समजलं की, त्यांना सापडलेल्या या अंगठीची किंमत काय आहे. लंडनमधील एका लिलावात ती विकली तेव्हा या अंगठीची किंमत £12,000 म्हणजे 11 लाखांपेक्षा जास्त मिळाली. रिचर्ड म्हणाले की, ते या पैशांचा वापर त्यांच्या मुलांच्या मदतीसाठी करतील..
लिलाव करणाऱ्या संस्थेकडून सांगण्यात आलं की, अंगठी 1620 सालातील आहे. ही अंगठी डेवॉनचे Humphrey Cockeram of Cullompton यांची आहे. अंगठीच्या मागे HC लिहिलेलं आहे. कॉकेरम फॅमिली 1620 मध्ये Hillersdon Manor मध्ये राहत होती. ते लोक चर्चला खूप मानत होते. अंगठी शुद्ध सोन्यापासून बनलेली आहे.