व्यक्तीने खरेदी केलं होतं सेकंड हॅंन्ड कपाट, आत सापडली ६० कोटी रूपये रोख रक्कम असलेली बॅग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 01:05 PM2022-05-05T13:05:22+5:302022-05-05T13:07:29+5:30
Jarahatke : डॅनने पुढे सांगितलं की, ज्या व्यक्तीने स्टोरेज कंटेनर खरेदी केला होता. त्याला कंटेनरमध्ये एक बॅग सापडली.
Jarahatke : एका व्यक्तीने वस्तू ठेवण्यासाठी एका सेकंड हॅंड कपाट खरेदी केलं होतं. ते त्याने घरी आणून उघडलं तर त्यात त्याला ६० कोटी रूपयांची रोख रक्कम सापडली. काही दिवसांनी या पैशांच्या खऱ्या मालकाला हे लक्षात आलं आणि कपाट घेणाऱ्या व्यक्तीला त्याला पैसे परत करावे लागले.
टीव्ही शो Storage Wars चा होस्ट डॅन डॉटसनने सोशल मीडियावर ४ वर्षाआधी घडलेल्या या घटनेचा खुलासा केला. तो म्हणाला की, एका क्लाएंटने लिलावादरम्यान काही सामान खरेदी केलं. ज्यात काही धक्का देणाऱ्या वस्तू सापडल्या. सोशल मीडियावर एक क्लीप पोस्ट करत डॅनने सांगितलं की, कशाप्रकारे एका व्यक्तीला वाटलं की, तो रातोरात कोट्याधीश झाला.
डॅनने पुढे सांगितलं की, ज्या व्यक्तीने स्टोरेज कंटेनर खरेदी केला होता. त्याला कंटेनरमध्ये एक बॅग सापडली. बॅग उघडण्यासाठी त्याने एका दुसऱ्या व्यक्तीला बोलवलं. जेव्हा त्यांनी बॅग उघडली तो त्यात त्यांना ६० कोटी रूपये आढळले.
मात्र, कटेंनरच्या मालकाला काही दिवसांनी त्याची चूक लक्षात आली आणि या व्यक्तीकडे त्याने वकील पाठवला. द ब्लास्ट मॅगझिनसोबत बोलताना डॅनने सांगितलं की, सुरूवातील वकिलांनी व्यक्तीला साधारण ४ कोटी रूपयांचं बक्षीस ऑफर केलं होतं. जे व्यक्तीने नाकारलं. दुसऱ्यांदा व्यक्तीला ९ कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली. जी व्यक्तीने स्वीकारली.
डॅन म्हणाला की, मला नाही वाटत की, एका बॅगमध्ये ६० कोटी रूपये ठेवून तुम्ही विसरू शकता. मला वाटतं की ही कॅश दुसऱ्या कुणाला ठेवण्यासाठी दिली गेली होती. पण आपल्याच पैशांसाठी कुणाला ९ कोटी रूपये बक्षीस देणं मोठी बाब आहे. असं सामान्यपणे कुणी करत नाही.