घराची छत दुरूस्त करत असताना सापडला एक जुना बॉक्स, उलगडलं 80 वर्ष जुनं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 10:50 AM2024-03-18T10:50:20+5:302024-03-18T10:50:44+5:30
एका व्यक्तीने अनेक वर्ष जुनं खरेदी केलं. त्याला वाटलं की, यात काही दुरूस्ती केल्या पाहिजे. त्याने छताचं काम सुरू केलं तेव्हा त्याला एक दरवाजा दिसला.
जुन्या घरांमध्ये अनेकदा साफसफाई करताना अनेक अशा वस्तू सापडतात ज्यांची कधी कल्पनाही केलेली नसते. या वस्तू अवाक् करणाऱ्या असतात. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं. तो घराची छत ठीक करत होता. कारण त्यातून पाणी गळत होतं. तेव्हाच त्याला एक अशी वस्तू सापडली. जी बघून तो अवाक् झाला. त्याला एक बॉक्स सापडला ज्यातून 80 वर्ष जुन्या एका रहस्याचा उलगडा झाला.
मिररच्या एका रिपोर्टनुसार, बेल्जिअममध्ये राहणाऱ्या व्यक्तीने अनेक वर्ष जुनं खरेदी केलं. त्याला वाटलं की, यात काही दुरूस्ती केल्या पाहिजे. त्याने छताचं काम सुरू केलं तेव्हा त्याला एक दरवाजा दिसला. मजुरांनी मलबा बाजूला केला तर एक बॉक्स दिसला. जो फार जुना होता. त्यांनी बॉक्स उघडला तर हैराण झाले.
बॉक्समध्ये एक लेटर
बॉक्समध्ये एक लेटर होतं. जे 21 जुलै 1941 ला लिहिलेलं होतं. यात त्यावेळी काम करणाऱ्या मजुरांनी आपली कहाणी लिहिली होती. त्यांना कोणत्या स्थितींमध्ये जगावं लागत होतं याबाबत सांगण्यात आलं होतं. सोबतच तरूणांना सल्लाही दिला होता. या लेटरवर चार लोकांच्या सह्या होत्या. त्यात जॉन जानसेन, जूल गिसेलिनक, लुईस चैन्ट्रेन आणि जूल वान हेमेल्डोनक यांचा समावेश आहे. चौकशी केल्यावर समजलं की, 82 वर्षाआधी याच लोकांनी हे छत बनवलं होतं. त्यावेळी त्यांना जे कूपन मिळत होते त्यावर त्यांनी लेटर लिहिलं होतं. ते त्यांनी एक बॉक्समध्ये बंद करून छतात पॅक केलं होतं.
काय लिहिलं होतं लेटरमध्ये
लेटरमध्ये लिहिलं होतं की, जेव्हा पुन्हा हे छत रिपेअर केलं जाईल तेव्हा ते बघण्यासाठी आम्ही जिवंत राहणार नाही. आम्हाला येणाऱ्या पिढ्यांना सांगायचं आहे की, आमचं जीवन आनंदी नाहीये. आम्ही दोन युद्धातून गेलो आहोत. एक 1914 आणि दुसरं 1940. आम्ही इथे उपाशी राहून काम करत आहोत. बरेच लोक तर भूकेमुळे मरण पावले. आमच्याकडे इतके पैसेही नाही की, रोज जेवण करू शकू.
त्यांनी लिहिलं की, पुढील पिढीला हा सल्ला आहे की, जेव्हाही युद्ध होईल असं वाटलं तर जिवंत राहण्यासाठी आधी तांदूळ, कॉफी, पीठ, धान्य, गहू घरात भरपूर स्टोर करून ठेवा. आपल्या घराची काळजी घ्या. पुरूषांना सलाम! ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लोक म्हणाले की, फार चांगलं संदेश आहे. आपण सगळ्यांनी याचं पालन केलं पाहिजे.