नशीबवान! घराची स्वच्छता करताना सापडलं 'असं' काही...; मिळाले 8 कोटी, आनंदाने झाला वेडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 02:33 PM2023-10-31T14:33:45+5:302023-10-31T14:34:13+5:30
घराची साफसफाई करणे हे बर्याचदा त्रासदायक काम असतं, परंतु काहीवेळा ते अत्यंत फायद्याचं देखील ठरू शकतं.
घराची साफसफाई करणे हे बर्याचदा त्रासदायक काम असतं, परंतु काहीवेळा ते अत्यंत फायद्याचं देखील ठरू शकतं. मॅसाचुसेट्समधील एका रहिवाशाला घर साफ करताना 1 मिलियन डॉलर (सुमारे 8 कोटी 30 लाख रुपये) किमतीचं लॉटरीचं तिकीट सापडलं. या तिकीटामुळे एका रात्रीत त्याचं नशीब फळफळलं असून त्याला प्रचंड आनंद झाला आहे.
मॅसाचुसेट्समधील खलील सौसा या व्यक्तीने काही महिन्यांपूर्वी 15 मिलियन डॉलरचं मनी मेकर स्क्रॅच लॉटरीचे तिकीट खरेदी केलं होतं. खलील सूसा यांनी सांगितले की ते तिकीट खरेदी केल्यानंतर ते विसरून गेले आणि नंतर घर साफ करताना तिकीट सापडले. सूसाने मॅसाचुसेट्स लॉटरीला सांगितलं की त्याच्या क्लिनरला अलीकडेच त्याच्या मेडफोर्डच्या घरातील फुलदाणीमध्ये तिकीट सापडलं. क्लिनरने तिकीट स्क्रॅच केलं.
सीबीएस न्यूजनुसार, जेव्हा मॅसाचुसेट्सचे रहिवासी खलील सूसा यांनी एक मिलियनची लॉटरी जिंकली, तेव्हा त्यांनी एकरकमी रोख पेमेंट निवडले, याचा अर्थ 650,000 डॉलर मिळाले. सूसा यांनी लॉटरी अधिकार्यांना सांगितलं की, त्याला त्याच्या लॉटरीचा काही भाग गरजू मित्राला मदत करण्यासाठी दान करायचा आहे.
सूसा म्हणाले की, त्यांचा मित्र आर्थिक परिस्थितीचा संघर्ष करत आहे आणि त्याला मदत करण्यास सक्षम झाल्यामुळे आनंदी आहे. सूसाने असंही सांगितलं की त्याची दान करण्याची आणखी काही योजना आहे. यावरून असे दिसून येते की लॉटरी विजेते केवळ स्वतःसाठी पैसे खर्च करत नाहीत तर इतरांना मदत करण्यासाठी देखील वापरतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.