व्यक्तीला सापडली घरात सिक्रेट तिजोरी, आत जे सापडलं ते पाहुन बसला धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 07:05 PM2022-05-05T19:05:28+5:302022-05-05T19:05:40+5:30

अलीकडेच एका टिकटॉकरने आपल्या अकाउंटवर असा एक व्हिडीओ शेअर केला, जो एखाद्या गुप्त मोहिमेबद्दल असल्यासारखं वाटत होता. मात्र नंतर असं स्पष्ट झालं, की तो व्हिडीओ मोठ्या एखाद्या मोहिमेचा नसला तरी ती घरगुती गुप्त मोहीम (Secret Mission) होती.

man found secret treasure in home found old things | व्यक्तीला सापडली घरात सिक्रेट तिजोरी, आत जे सापडलं ते पाहुन बसला धक्का!

व्यक्तीला सापडली घरात सिक्रेट तिजोरी, आत जे सापडलं ते पाहुन बसला धक्का!

Next

सध्या सोशल मीडियाचा (Social Media) जमाना आहे. त्यामुळे एखादी वेगळी किंवा विचित्र गोष्ट घडली, तर ती बातमी सगळीकडे पोहोचायला फारसा वेळ लागत नाही. अलीकडेच एका टिकटॉकरने आपल्या अकाउंटवर असा एक व्हिडीओ शेअर केला, जो एखाद्या गुप्त मोहिमेबद्दल असल्यासारखं वाटत होता. मात्र नंतर असं स्पष्ट झालं, की तो व्हिडीओ मोठ्या एखाद्या मोहिमेचा नसला तरी ती घरगुती गुप्त मोहीम (Secret Mission) होती.

अमेरिकेतल्या एका टिकटॉक युझरने आपल्या अकाउंटवरून नव्या घरातील एका गुप्त जागेबद्दलचा (Secret Place in home) व्हिडीओ शेअर केला. तो व्हिडीओ पाहिल्यावर असं वाटलं, की त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जुन्या घरमालकांनीही प्रयत्न केले असणार; मात्र ते त्यात यशस्वी झाले नाहीत. ती गुप्त जागा म्हणजे घरात आत तयार करण्यात आलेली तिजोरी होती. ती तिजोरी कोणीच उघडू शकलं नव्हतं.

घरात जी गुप्त तिजोरी मिळाली होती, ती उघडणं, तोडणं सोपं नव्हतं. खूप मजबूत आणि अनेक वर्षं बंदच असलेल्या रहस्यमय तिजोरीत (Secret Vault) असं नेमकं काय होतं, जे सुरक्षित ठेवण्यासाठी तिजोरीत ठेवण्यात आलं आणि ते अशा पद्धतीने लॉक करण्यात आलं, की जे कोणीच उघडू शकणार नाही किंवा तोडूही शकणार नाही. नव्या घरमालकिणीने या तिजोरीच्या आत नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी काही जणांनी मदत घेतली. आपल्या वडिलांचीही मदत तिने घेतली. या सर्वांनी मिळून ती तिजोरी अखेर उघडलीच. त्या तिजोरीत काही दशकांपूर्वीची किंबहुना काही शतकांपूर्वीची काही कागदपत्रं (Ole Documents) होती. तिजोरीच्या मालकासाठी कदाचित ती कागदपत्रं खूपच महत्त्वाची असावीत. ही गुप्त तिजोरी चिमणीच्या खाली झाकून ठेवण्यात आली होती.

टिकटॉकरने (Tiktoker) ही तिजोरी उघडण्याच्या घटनेचा व्हिडीओ शेअर केला. तो खूप व्हायरल झाला. त्या व्हिडिओला आतापर्यंत 70 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे घर 1950च्या दशकात कसं बांधण्यात आलं होतं, असं घराच्या नव्या मालकिणीने सांगितलं. तसंच ज्या व्यक्तीकडून तिने हे घर विकत घेतलं, त्यांना या लाकडी पॅनेलच्या पाठीमागे काय होतं याबद्दल काहीही कसं माहिती नव्हतं, हेही त्या घरमालकिणीने सांगितलं. खरं तर तिजोरीवर घाव घातल्याच्या तीन खुणा दिसत होत्या. त्यावरून असं दिसून येत होतं, की यापूर्वीही तिजोरी फोडण्याचे प्रयत्न करण्यात आले होते; मात्र त्यात यश कोणालाच मिळालं नव्हतं.

शेवटी त्या नव्या घरमालकिणीने आपल्या वडिलांच्या मदतीने तिजोरी उघडली. त्यात, दुसऱ्या जागतिक महायुद्धाला 50 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने तयार करण्यात आलेली नाणी त्याठिकाणी सापडली. तसंच काही रत्नं आणि पत्त्यांचा कॅटही सापडला. तसंच त्या तिजोरीत 1850 सालचं एक प्राचीन वृत्तपत्रही होतं.

मात्र या प्राचीन वस्तूंबाबत त्या महिलेकडून करण्यात आलेल्या बेपर्वाईबद्दल सोशल मीडिया युजर्सनी नाराजी व्यक्त केली. प्राचीन काळापासून ज्या वस्तू इतक्या जपून ठेवण्यात आल्या होत्या, त्या आतादेखील सांभाळून ठेवायला हव्यात. कारण त्या किती महत्त्वपूर्ण आहेत, याबद्दल काय सांगावं? त्या वस्तू संबंधित महिलेसाठी महत्त्वाच्या नसतील पण एखाद्याने काहीतरी महत्वाचे म्हणूनच त्या एवढ्या जपून ठेवल्या आहेत ना, अशा आशयाच्या कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.

Web Title: man found secret treasure in home found old things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.