मातीत हात टाकला अन् सापडला 1500 वर्ष जुना खजिना, कमाल आहे कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 01:16 PM2023-09-19T13:16:26+5:302023-09-19T13:18:38+5:30
एरलॅंडला काही आरोग्यासंबंधी समस्या आहेत. ज्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की, दिवसभर खुर्चीवर बसण्यापेक्षा बाहेर फिरा.
ही व्यक्ती आपल्या मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून वस्तू शोधत होता. तेव्हाच त्याच्या हाती मोठा खजिना लागला. या इतक्या मौल्यवान वस्तू आहेत ज्यांचा वापर 1500 वर्षाआधी लोक करत होते. त्याला बरंच सोनं सापडलं. यात 9 पेंडेंट, 3 अंगठ्या आणि 10 सोन्याच्या वस्तू सापडल्या. ही घटना नॉर्वेमधील आहे. इथे 51 वर्षीय एरलॅंड बोरेला रेनेसोएमध्ये दक्षिण द्वीपावर खजिना सापडला. एरलॅंडला काही आरोग्यासंबंधी समस्या आहेत. ज्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की, दिवसभर खुर्चीवर बसण्यापेक्षा बाहेर फिरा.
मग काय त्यानी एक मेटल डिटेक्टर खरेदी केलं. त्याना इतकं सोनं सापडलं की, ज्यांनाही माहीत पडलं ते हैराण झाले. वान्गर यूनिवर्सिटीच्या पुरातत्व विभागाचे मुख्य ओले मॅ़डसेन म्हणाले की, 'एकाचवेळी इतकं सोनं सापडणं कॉमन नाही'. एरलॅंड यानी ऑगस्ट महिन्यात बेटावर फिरण्यास सुरूवात केली. आधी तर त्याना कचराच सापडला. पण नंतर त्यांची लॉटरी लागली. जेव्हा त्यांनी याचं वजन केलं तेव्हा ते 100 ग्रॅमपेक्षा जास्त होतं.
या देशाच्या कायद्यानुसार, 1537 सालापेक्षा जुन्या वस्तू आणि 1650 पेक्षा जुन्या नाण्यांना सरकारी संपत्ती मानलं जातं. या वस्तू सरकारला सोपवायच्या असतात. याबाबत असोसिएट प्रोफेसर हाकोन रियरसन म्हणाले की, दागिण्यांमधील एक वस्तू गोल्ड मेडलसारखी दिसते. त्याचा एका बाजूलाच सोनं आहे. यूरोपमधील प्रवासी जेव्हा एका ठिकाणाहून दुसरीकडे जात होते तेव्हाच या वस्तू इथे राहिल्या असतील. या वस्तू पाहून हेच वाटतं की, यांचा वापर समाजातील शक्तीशाली लोकच करत असतील.
या घटनेबाबत एक दुसरे प्रोफेसर सिगमंड ओएहर्ल म्हणाले की, अशाप्रकारच्या 1000 हजार सोन्याच्या वस्तू सापडल्या आहेत. या नॉर्वेशिवाय स्वीडन आणि डेन्मार्कमध्ये सापडल्या. यात त्यांच्या देवाला एका घोड्याला ठीक करताना दाखवलं आहे. घोड्याचं प्रतिक आजार आणि संकटाबाबत दाखवलं जातं. यात देवही आहे. त्यामुळे याला नवं जीवन आणि आशाही म्हटलं जातं.