पाहता पाहता मालामाल झाली ही व्यक्ती, हाती लागलं राजाचं दुर्मीळ नाणं; किंमत वाचून हैराण व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 03:53 PM2021-08-02T15:53:51+5:302021-08-02T15:57:02+5:30
तो जेव्हा तिथे मेटल डिटेक्टर घेऊन पोहोचला तर आवाज आला. त्यानंतर त्याने तिथे खोदकाम केलं आणि त्याच्या हाती अशी वस्तू लागली ज्याचा कुणाला अंदाजही नव्हता.
आपण नेहमीच ऐकतो की, खोदकाम करताना लोकांना ऐतिहासिक नाणी सापडतात. त्यांची किंमतही भरमसाठ असते. पण आजही जुन्या नाण्यांच्या किंमती आपल्याला पूर्णपणे माहीत नाही. काही लोक त्यांना किंमती वस्तू समजून आपल्या जवळ ठेवतात तर काही लोक ते विकतात. अशी एक घटना ब्रिटनमधून समोर आली आहे. इथे एका व्यक्तीला खोदकाम करताना किंमती नाणं सापडलं आणि तो कोट्याधीश झाला.
'द इंडिपेंडेंट' च्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या विल्टशायर आणि हॅम्पशायरच्या सीमेवरील वेस्ट डीनमध्ये एका व्यक्ती कोट्यावधी किंमतीचं नाणं वाळूच्या आत सापडलं. हे दुर्मीळ नाणं मेटर डिटेक्टरच्या मदतीने त्याला सापडलं. गेल्यावर्षी मार्च महिन्यात त्याला हे नाणं सापडलं. ज्याची किंमत २००,००० पाउंड म्हणजे साधारण दोन कोटी रूपये असल्याचा अंदाज आहे.
८ वर्षाच्या प्रयत्नानंतर यश
मीडिया रिपोर्टनुसार, ३० पेंसचं हे नाणं वेस्ट सॅक्सनचा राजा एक्गबर्टच्या काळातील आहे. ज्याचं वजन ४.८२ ग्रॅम आहे. असंही सांगण्यात आलं आहे की, हे नाणं शोधणारी व्यक्ती गेल्या ८ वर्षापासून खजिन्याचा शोध घेत आहे. त्याच्या रिसर्च आणि अंदाजानुसार विल्टशायर आणि हॅम्पशायर सीमेवर खजिना असण्याची शक्यता होता. तो जेव्हा तिथे मेटल डिटेक्टर घेऊन पोहोचला तर आवाज आला. त्यानंतर त्याने तिथे खोदकाम केलं आणि त्याच्या हाती अशी वस्तू लागली ज्याचा कुणाला अंदाजही नव्हता.
मीडिया रिपोर्टनुसार, या नाण्याची टेस्ट यावर्षी जून महिन्यात करण्यात आली. ज्यात सांगण्यात आलं की, हे नाणं शुद्ध सोन्याचं आहे आणि यात फार कमी प्रमाणात चांदी-तांब आहे. आता या नाण्याच्या लिलावाची तारीखही ठरवण्यात आली आहे. लिलाव पुढील महिन्यात ८ सप्टेंबरला असेल.