अबब! जगातील सर्वात उंच सायकल बनवली याने, नोंद झाली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 16:41 IST2022-01-19T16:30:57+5:302022-01-19T16:41:57+5:30
एका व्यक्तीने आपल्या कौशल्याने आणि जुगाडाच्या जोरावर असा पराक्रम केला आहे, की त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड(Guinness World Record)मध्ये नोंदवले गेले आहे.

अबब! जगातील सर्वात उंच सायकल बनवली याने, नोंद झाली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
जगातील अनेक लोक त्यांच्या आश्चर्यकारक कामांसाठी ओळखले जातात. काही लोक जुगाड (Jugaad) आणि मेंदू लावून असे अनोखे काम करतात, ज्याद्वारे विश्वविक्रम होतो. पोलंड(Poland)मधील एका व्यक्तीने असेच काहीसे केले. या व्यक्तीने आपल्या कौशल्याने आणि जुगाडाच्या जोरावर असा पराक्रम केला आहे, की त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड(Guinness World Record)मध्ये नोंदवले गेले आहे.
पोलंडच्या या व्यक्तीने जगातील सर्वात उंच सायकल बनवली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की या सायकलची उंची २४ फूट ३.७३ इंच म्हणजेच ७.४१ मीटर आहे. या माणसाचा पराक्रम इतका जबरदस्त आहे, की ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ने स्वत: त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्या व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये हा माणूस जगातील सर्वात उंच सायकल चालवताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीचे आणि त्याच्या शोधाचे कौतुक केल्याशिवाय स्वतःला थांबवू शकणार नाहीत. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने कॅप्शन लिहिले, ‘Tallest rideable bicycle 24 ft 3.73 in) by Adam Zdanowicz.’ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही याबाबत काही अनोखी माहिती दिली. व्हिडिओ पाहा…
अॅडमच्या मते, ही त्याची आजपर्यंतची सर्वात मोठी सायकल आहे, जी त्याने डिझाइन केली आहे. एक उत्तम साहसी राइड असे त्याचे वर्णन आहे. ते तयार करण्यासाठी त्याला सुमारे एक महिना लागला. त्याच्या सायकलच्या निर्मितीमध्ये त्याने फक्त जुने जीर्ण झालेले साहित्य वापरले. सोशल मीडियावर ही सायकल लोकांना खूप आवडतेय. या व्हिडिओला आतापर्यंत ६१ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.