न पिताच नशा! केवळ केक खाऊन ही व्यक्ती होते दारूपेक्षाही जास्त टल्ली...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 10:23 AM2021-01-14T10:23:53+5:302021-01-14T10:24:03+5:30
या डिसऑर्डरच्या कंडीशनमध्ये निकचं शरीर कार्बोहायड्रेट्सला अल्कोहोलमध्ये बदलतं. ज्यामुळे दारू न पिताही त्याला नशा येते.
अमेरिकेतील एक व्यक्ती फारच विचित्र अशा कंडीशनचा सामना करत आहे. ६२ वर्षीय निक कार्सनला एक डिसऑर्डर आहे ज्यामुळे विना मद्यसेवन करताही त्याला नशा येते. निक ऑटो ब्रूवेरी सिंड्रोमने ग्रस्त आहे. तो जेव्हाही केक खातो किंवा कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ खातो तेव्हा त्याला नशा येते. ही नशा साधीसूधी नाही तर खूप जास्त मद्यसेवन केल्यासारखी नशा येते.
या डिसऑर्डरच्या कंडीशनमध्ये निकचं शरीर कार्बोहायड्रेट्सला अल्कोहोलमध्ये बदलतं. ज्यामुळे दारू न पिताही त्याला नशा येते. भलेही हे ऐकायला इंटरेस्टीग वाटत असेल पण ही कंडीशन फार गंभीर आहे. कारण थोडासा केस खाऊनही काही मिनिटांमध्ये तो लीगल डायव्हिंग लिमिटपेक्षा तीन पटीने अधिक नशेत असतो. २० वर्षांआधी निक स्ट्रॉंग केमिकल्सने एक्सपोज झाला होता. ज्यामुळे त्याच्यात ही समस्या निर्माण झाली आहे.
निकला नेहमी सोबत एक ब्रेथ एनालायजर ठेवावा लागतो कारण त्याला हे माहीत नसतं की, त्याला कधी नशा येईल. केवळ केकच नाही तर थोडीशी शुगर किंवा कार्बोहायड्रेड्सचं घेतलं तर त्याला फार नशा येते. हेच कारण आहे की, निक कीटो डाएट घेण्याचा प्रयत्न करतो. या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण फार कमी असतं आणि प्रोटीन-फॅट्सचं प्रमाण अधिक असतं.
निकने लॅड बायबल बोलताना सांगितले की, कधी-कधी लोक माझ्या या समस्येची खिल्ली उडवतात. कारण त्यांना वाटतं की, मला ड्रिंकसाठी घेऊन जाणं फार स्वस्त पडेल. कारण मी न पिताच केवळ काही खाऊन नशेत राहतो. पण हे माझ्यासाठी चांगलं नाही. मी या समस्येमुळे मला आवडणारे कित्येक पदार्थ खाऊ शकत नाही.
निक आपल्या या समस्येचा हिंमतीने सामना करत आहे. तो म्हणाला की, मी माझ्या शरीरात चांगले गुड बॅक्टेरिया डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहे आणि पूर्णपणे नॅच्युरल होण्याचा प्रयत्न करत आहे. आता मला माझ्या कंडीशनबाबत माहीत आहे त्यामुळे स्थिती मॅनेज करणं सोपं झालं आहे. पण या कंडीशनमुळे मला केक खाण्याची इच्छा मारावी लागते.