बाबो! वाढदिवसाच्या दिवशी या व्यक्तीला आले तब्बल १५ हजारांपेक्षा जास्त फोन कॉल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 04:07 PM2019-03-14T16:07:13+5:302019-03-14T16:10:24+5:30

कुणाचाही वाढदिवस म्हटला की, त्या व्यक्तीला ओळखीची लोकं फोन करून शुभेच्छा देतात. तर काही लोक सोशल मीडियातूनही शुभेच्छा देतात.

Man gets over 15 thousand phone calls on birthday | बाबो! वाढदिवसाच्या दिवशी या व्यक्तीला आले तब्बल १५ हजारांपेक्षा जास्त फोन कॉल!

बाबो! वाढदिवसाच्या दिवशी या व्यक्तीला आले तब्बल १५ हजारांपेक्षा जास्त फोन कॉल!

googlenewsNext

कुणाचाही वाढदिवस म्हटला की, त्या व्यक्तीला ओळखीची लोकं फोन करून शुभेच्छा देतात. तर काही लोक सोशल मीडियातूनही शुभेच्छा देतात. पण सामान्यपणे तुम्हाल वाढवदिवसाला किती फोन येत असतील? १०, १५, २० चला ५० पकडून चला. पण एका व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चक्क १५ हजार लोकांनी फोन कॉल केले. त्यामुळे हा व्यक्ती त्याचा ६२वा वाढदिवस आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. 

मुलाच्या कारनाम्यामुळे झाला घोळ

झालं असं की, क्रिस यांचा वाढदिवस होता. त्यांच्या मुलाला वाटलं की, वडिलांसोबत थोडी गंमत केली जावी. यासाठी त्याने वडिलांचा वाढदिवस वेगळा करण्यासाठी स्थानिक परीसरातील रस्त्यांवर बिलबोर्ड लावलेत. त्यावर वडिलांचा फोटो आणि 'माझ्या वडिलांना शुभेच्छा द्या' असं लिहिलं होतं. सोबतच मोबाइल नंबरही दिला होता. मुलांना वाटलं की, हे केवळ स्थानिक रस्त्यांपुरतंच मर्यादित राहील. पण पाहता पाहता बिलहबोर्ड सोशल मीडियात व्हायरल झालेत. 

६ मार्चला लावण्यात आले होते बिलबोर्ड्स

रिपोर्ट्सनुसार, १२ पर्यंत जगभरातील लोकांकडून क्रिस यांना १५ पेक्षा जास्त फोन कॉल्स आले होते. त्यासोबतच दुसऱ्या देशांमधून टेक्स्ट मेसेज देखील आले होते. फोन आणि मेसेजचा हा सिलसिला अजूनही सुरू आहे. या सर्वांचे क्रिस यांनी धन्यवाद मानले. 

सत्य समोर आलं तेव्हा हसू आवरलं नाही

क्रिस सांगतात की, ६ मार्चपासून ते अजूनही त्यांचा फोन सामान्य रूपाने वापरू शकले नाहीत. आधी तर त्यांना हे कळालं नाही त्यांच्यासोबत हे काय होत आहे. पण दुसऱ्या दिवशी ७ मार्चला त्यांना संपूर्ण प्रकरण कळालं. तेव्हा त्यांना हसू आवरलं नाही. 

अजून एक महिना तसेच राहणार बोर्ड

मजेदार बाब ही आहे की, क्रिस यांच्या वाढदिवसाचे हे बिलबोर्ड एप्रिल महिन्यापर्यंत तसेच राहणाह आहेत. म्हणजे अजूनही त्यांना हजारो फोन कॉल्स येणार आहेत. जेव्हा क्रिस यांनी मुलांना याबाबत विचारले तेव्हा हसत हसत ते म्हणाले की, 'पुढील वर्षी आम्ही याहीपेक्षा मोठे बिलबोर्ड लावण्याचा प्लॅन करत आहोत'.
 

Web Title: Man gets over 15 thousand phone calls on birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.