फुकटचं खायला मिळतं म्हणून 'ती' बनली 'त्याची' गर्लफ्रेन्ड, मुलाने असा शिकवला धडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 11:56 AM2020-01-09T11:56:42+5:302020-01-09T12:03:36+5:30
प्रेमात पडल्यावर माणून पार्टनरला खूश करण्यासाठी त्याला जमेल ते करतो. म्हणजे भरपूर खर्च करतो. डेटिंगच्या या काळात तर पैसा अधिक खर्च होतो.
(Image Credit : treebo.com)(सांकेतिक फोटो)
प्रेमात पडल्यावर माणून पार्टनरला खूश करण्यासाठी त्याला जमेल ते करतो. म्हणजे भरपूर खर्च करतो. डेटिंगच्या या काळात तर पैसा अधिक खर्च होतो. दोघांनाही एकमेकांना खूश करायचं असतं. इम्प्रेशन पाडायचं असतं. याच संबंधी एक किस्सा एका रेडीट यूजरने सांगितला आहे.
त्याने सांगितले की, एक मुलगी त्याच्यासोबत अनेकदा डेटला गेली होती. ही एक कॅज्युअल डेट होती. वेगवेगळ्या ठिकाणांवर जाणे, खाणे, एकमेकांना जाणून घेणे अशी होती. पण नंतर त्याला असं कळालं की, ही मुलगी त्याच्यासोबत केवळ फुकटचं जेवण मिळत होत म्हणून येत होती. मग काय सगळा पैसा वसूल करण्यासाठी त्याने एक आयडियाची कल्पना लावली.
(Image Credit : edenrochotelmiami.com)(सांकेतिक फोटो)
रेडीट यूजर Redberryberry ने ही पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले की, 'मला ही मुलगी फार आवडत होती. आम्ही दोघेही लाइफगार्ड सर्टिफिकेशन कोर्सदरम्यान भेटलो होतो. दोघांनी एकमेकांना नंबर दिलेत. सोशल मीडियाही फॉलो करायला लागलो. चॅटींग केलं. मग मी तिला मुव्हीसाठी विचारलं आणि ती लगेच तयार झाली'.
त्याने पुढे लिहिले की, 'आम्ही अनेक डेट्सवर सोबत गेलो. आम्ही जास्तकरून बाहेरच जात होतो. एक दिवस तिच्या एका मित्राने मला हा स्क्रीनशॉट दाखवला. त्यालाही मी लाइफागार्ड कोर्समध्येच भेटलो होतो'. या स्क्रीनशॉटमध्ये त्या मित्राने मुलीला विचारलं आहे की, काय तू आणि तो मुलगा हॅंगआउट करत आहात? त्यावर मुलीने उत्तर दिलं की, असं नाहीये. पण जोपर्यंत तो माझा खर्च करणार मी जात राहणार'.
(Image Credit : dreamstop.com)
हा स्क्रीनशॉट पाहिल्यावर त्याचं डोकं सरकलं आणि त्याने त्या मुलीला मेसेज केला. पुन्हा दोघे एका रेस्टॉरन्टमध्ये गेले. तेही महागड्या. त्याने लिहिले की, 'मी तेथील सर्वात महागडी डिश निवडली. तिने सुद्धा तेच केलं. आयस्क्रीम आणि इतरही काही ड्रिंक्स मागवले. त्यानंतर मी तिथून कलटी मारली. ४५ मिनिटांनी तिचा मेसेज आला की, तिच्याकडे पैसे नाहीत. नंतर तिच्या आईने येऊन पेमेंट केलं. मला माहीत होतं की, बिल जास्त नाही. पण मला तिला त्या स्थितीत सोडून जाणं चांगलं वाटलं'.