बोंबला! दोन कुत्र्यांच्या नावामुळे मालकाला १० दिवस तुरूंगवासाची शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 04:06 PM2019-05-18T16:06:07+5:302019-05-18T16:13:03+5:30
कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी मानला जातो. अनेकदा तर कुत्रे मनुष्यांपेक्षाही चांगले ठरतात. पण इथे कुत्रे प्रामाणिक असण्याची विषय नाहीये.
कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी मानला जातो. अनेकदा तर कुत्रे मनुष्यांपेक्षाही चांगले ठरतात. पण इथे कुत्रे प्रामाणिक असण्याची विषय नाहीये. बातमी अशी आहे की, एका व्यक्तीला त्याच्या कुत्र्यांच्या नावामुळे १० दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. असे सांगितले जात आहे की, या व्यक्तीने त्याच्या कुत्र्यांची नावं चीन सरकार आणि सरकारच्या सिव्हिल सर्व्हिस अधिकाऱ्यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. याचीच त्याला शिक्षा मिळाली आहे.
चीनमध्ये राहणाऱ्या या ३० वर्षीय व्यक्तीचं नाव बेन आहे. गेल्या सोमवारी त्याला पोलिसांना नोटीस पाठवली होती. बेनने सोशल मीडिया नेटवर्क व्ही चॅटवर पोस्ट शेअर केली होती. यात त्याने सांगितले होते की, त्याने त्यांच्या कुत्र्यांची नावे Chengguan आणि Xieguan अशी ठेवली आहेत. यातील पहिलं नाव हे छोटे-मोठे गुन्हे निपटवणाऱ्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहे. तर दुसरं सिव्हिल सर्व्हिसमध्ये ट्रॅफिक असिस्टंट म्हणूण काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहे. चीनमध्ये अशी नावे कायद्याने अवैध मानली जातात.
बेन ने सांगितले की, 'मला माहिती नव्हतं की, हे नावे अवैध आहेत. मला या नावांमध्ये ह्यूमर दिसला होता. त्यामुळे मी कुत्र्यांची ही नावे ठेवली. पण पोलिसांना यात काही ह्यूमर दिसला नाही आणि त्यांनी कारवाई केली'.
बिजिंग न्यूजसोबत बोलताना एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'डॉग ब्रिडरची पोस्ट सोशल मीडियात लोकांना भडकवणारी होती आणि याने देशाच्या-शहराच्या व्यवस्थेसाठी नुकसानकारक होतं. त्यामुळे आम्ही त्याच्यावर कारवाई केली'.
बेन याला आता १० दिवसाच्या तुरूंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे ही बातमी समोर आल्यावर सोशल मीडियातून लोकांनी यावर आश्चर्य व्यक्त केलंय. लोकांचं म्हणणं आहे की, अशाप्रकारचे नियम कशाप्रकारेही ठरवले जाऊ शकत नाही.