लग्नाच्या 20 वर्षानंतर समजलं पत्नीचं एक सीक्रेट, आता घटस्फोट देतोय पती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 09:10 AM2024-01-11T09:10:55+5:302024-01-11T09:11:10+5:30
पत्नीचं कॉलेज वेळचं एक सीक्रेट समजलं. ज्यामुळे तो बिथरला. हे त्याला सहन होत नाहीये.
प्रेम, लग्नाबाबत वेगवेगळ्या अजब घटना सोशल मीडियावर समोर येत असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एका व्यक्तीने त्याची कहाणी शेअर केली. त्याने लोकांसोबत त्याच्या जीवनातील समस्या शेअर केली. त्याने सांगितलं की, त्याच्या लग्नाला 20 वर्षे झालीत. पण पत्नीचं कॉलेज वेळचं एक सीक्रेट समजलं. ज्यामुळे तो बिथरला. हे त्याला सहन होत नाहीये.
त्याने सांगितलं की, पत्नीने त्याला रिलेशनशिपच्या सुरूवातीच्या दिवसांमधेच दगा दिला होता. तेव्हा त्याला याबाबत माहीत नव्हतं. पण ते आता त्याला समजलं. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, तो म्हणाला की, तो त्याच्या पत्नीला पहिल्यांदा हायस्कूलमध्ये भेटला होता.
तो एक वर्षाने सीनिअर होता. दोघेही प्रेमात पडले. डेटिंग सुरू केलं. रिलेशनशिप चांगलं सुरू होतं. मधला काही काळ दोघे एकमेकांपासून दूर राहिले. पण तेव्हाही सगळं काही ठीक होतं. नंतर त्यांनी लग्न केलं. कपलला दोन मुले आहेत. लग्नाची ही 20 वर्ष आनंदात गेली.
तो म्हणाला की, पत्नीने त्यांच्या रिलेशनशिपच्या दिवसांमध्ये असं काही केलं होतं जे आजपर्यंत सीक्रेट होतं. पण त्याला त्याबाबत आता समजलं आहे. ज्यामुळे त्याला धक्का बसला. तो पत्नीला माफ करू शकत नाहीये आणि तिला घटस्फोट देत आहे.
त्याने सांगितलं की, पत्नीच्या कॉलेजच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात दोघांचं लॉंग डिस्टेंस रिलेशनशिप सुरू होतं. यादरम्यान त्याने एक वर्ष हायस्कूल आणि दुसरं कम्युनिटी कॉलेजमध्ये घालवलं. नंतर दोघांनीही एकाच शहरात एकाच कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. तेव्हापासून दोघे सोबत राहिले. ग्रॅजुएशननंतर लग्न केलं.
काय होतं सीक्रेट
या व्यक्तीने खुलासा केला की, ख्रिसमसच्या दिवशी तो पत्नीसोबत कॉलेजच्या काही मित्राना भेटला. पत्नी म्हणाली की, ती या पुरूषांना हायस्कूलवेळी भेटली होती. यातील एक पुरूष म्हणाला की, हायस्कूल किती चांगलं होतं आणि कॉलेजचं ते वर्षही शानदार होतं.
बस इथे पत्नी म्हणाली की, ती आता पुढे काही बोलणार नाही. पतीने पत्नीला विचारलं पण ती गप्प राहिली. पण नंतर ती बोलण्यास तयार झाली.
तिने सांगितलं की, तिने कॉलेजच्या त्या दोन वर्षांमध्ये अनेक पुरूषांसोबत संबंध ठेवले. ती म्हणाली की, ही काही फार मोठी बाब नव्हती, कारण तिचं लॉंग डिस्टेंस रिलेशनशिप सुरू होतं. तेव्हा तिला वाटत नव्हतं की, तिचं रिलेशनशिप इतकं लांब चालेल.
व्यक्तीला त्याच्या पत्नीने सांगितलं की, तिने 10 पुरूषांसोबत संबंध ठेवले आहे, ज्यातील 3 पुरूषांसोबत त्याने भेट करून दिली होती. यातील एकासोबत ती आजही बोलते. हे समोर आल्याच्या दुसऱ्याच दिवशी व्यक्तीने घटस्फोटासाठी अर्ज केला.
परिवाराने त्याला सांगितलं की, भूतकाळातील चुकांमुळे असा निर्णय घेणं योग्य नाही. त्यांच्या एका मुलाचं वय 17 तर दुसऱ्याचं 19 वर्षे आहे. व्यक्ती म्हणाला की, त्याला आशा आहे की, मुलं त्याचा हा निर्णय समजून घेतील.
तो म्हणाला की, मी माझ्या विश्वासावर कायम आहे. अनेक वर्ष अनेक पुरूषांसोबत संबंध ठेवून मला दगा देणं स्वीकार नाही. हे कधीही झालेलं असो पण हे सत्य आहे की, तिने माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहत असताना इतर लोकांसोबत संबंध ठेवले. हे मी स्वीकार करू शकत नाही. हा माझा अपमान आहे.