गॉलब्लॅडरच्या ऑपरेशनसाठी गेलेल्या रूग्णाची डॉक्टरांनी चुकून केली नसबंदी आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 11:30 AM2024-03-04T11:30:18+5:302024-03-04T11:31:43+5:30
गेल्या आठवड्यात 41 वर्षीय जॉर्ज बेसटो गॉलब्लॅडर सर्जरीसाठी अर्जेंटीनाच्या कार्डोबामध्ये फ्लोरेंसियो डियाज हॉस्पिटलमध्ये गेला होता.
अर्जेंटीनातील एक व्यक्ती आपल्या गॉलब्लेडरच्या सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. पण त्याला जराही अंदाज नव्हता की, त्याच्यासोबत जे होणार आहे त्याने त्याच जीवन बदलेल. सर्जरी झाल्यावर जसा तो बाहेर आला तर त्याचं जीवन बदलून गेलं होतं. त्याला वाटलं त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं.
गेल्या आठवड्यात 41 वर्षीय जॉर्ज बेसटो गॉलब्लॅडर सर्जरीसाठी अर्जेंटीनाच्या कार्डोबामध्ये फ्लोरेंसियो डियाज हॉस्पिटलमध्ये गेला होता. ऑपरेशन 28 फेब्रुवारीला शेड्यूल करण्यात आलं होतं. पण जॉर्जचं ऑपरेशन बुधवारपर्यंत टाळण्यात आलं. पण यातच एक गडबड झाली.
ऑपरेशनच्या दिवशी हॉस्पिटलचे कर्मचारी रूममध्ये आले, त्याला स्ट्रेचरवर झोपवलं आणि त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनाही त्याचा चार्ट पाहिला नाही. डॉक्टरांना हे माहीत नव्हतं की, रूग्णाचं ऑपरेशन रिशेड्यूल करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी तशीच सर्जरी केली जी त्या दिवशी शेड्यूल करण्यात आली होती. पण ही सर्जरी नसबंदीची होती.
जॉर्ज जेव्हा ऑपरेशननंतर जागा झाला तेव्हा माहीत नव्हतं की, त्याच्यासोबत काय झालं. तेव्हाच डॉक्टर चेकअपसाठी आले. त्याचा चार्ट पाहिल्यानंतर त्यांनी त्याला धक्कादायक बातमी दिली. त्याच्या गॉलब्लॅडरच्या ऑपरेशनऐवजी त्याची नसबंदी करण्यात आली होती. रूग्ण हे ऐकून घाबरला. पण त्याच्याकडे जास्त वेळ नव्हता कारण त्याला आता गॉलब्लॅडरच्या ऑपरेशनसाठी जायचं होतं.
आपल्या दुसऱ्या ऑपरेशननंतर जॉर्जला हे जाणून घ्यायचं होतं चूक कशी झाली आणि त्याला बरं कसं करता येईल. तेच डॉक्टर या चुकीसाठी एकमेकांना दोष देत होते. ते म्हणाले की, तुम्ही जास्त टेंशन घेण्याची गरज नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्टिफीशिअल इनसॅमिनेशनच्या माध्यमातूनही वडील बनू शकता. नसबंदी रूग्णाच्या वयानुसार पुन्हा बरोबर करणं शक्य नव्हतं.
जॉर्ज म्हणाला की, माझ्या चार्टवर सगळीकडे गॉलब्लॅडरर लिहिलेलं होतं. त्यांनी फक्त ते वाचायचं होतं. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही एक्सपर्ट असण्याची गरज नव्हती. मला कुणाला दोष द्यायचा नाहीये, पण इथे कुणी जबाबदारी घेत नाहीये. ते हेच म्हणत आहे की, तुम्ही ऑर्टिफीशियल इनसॅमिनेशनच्या माध्यमातून अजूनही वडील बनू शकता. आता जॉर्ज हॉस्पिटलवर केस करू शकतो.