बाबो! 'या' माणसाकडे एकाच बॅंकेचे आहेत ६४ डेबिट कार्ड, कारण वाचून व्हाल हैराण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:01 PM2021-03-16T15:01:46+5:302021-03-16T15:02:38+5:30
रेडइटवर पीटर नावाच्या व्यक्तीने या सर्व डेबिट कार्ड्सचा एकत्र एक फोटो शेअर केला होता. सोबतच पूर्ण किस्साही लिहिला.
तुमच्याकडे एखाद्या बॅंकेचे किती डेबिट कार्ड आहेत? एक किंवा दोन? तीन किंवा चार? साधारणपणे एक किंवा दोन असतात. पण एका व्यक्तीकडे एकाच बॅंकेचे, एकाच अकाऊंट नंबरचे तब्बल ६४ डेबिट कार्ड आहेत. हे कार्ड बॅंकेच्या चुकीमुळे त्याच्याकडे पोहोचले.
रेडइटवर पीटर नावाच्या व्यक्तीने या सर्व डेबिट कार्ड्सचा एकत्र एक फोटो शेअर केला होता. सोबतच पूर्ण किस्साही लिहिला. पीटरने सांगितले की, त्याचं डेबिट कार्ड एक्सपायर झालं होतं. त्या बदल्यात बॅंकेने नवं डेबिट कार्ड पाठवायचं होतं. पण बॅकेने दर काही दिवसांआड एक-दोन नवे डेबिट कार्ड पाठवले. हे सर्वच कार्ड एकाच बॅंक खात्यासोबत लिंक आहे आणि रिप्लेसमेंट म्हणून आले आहेत.
डिसेंबरमध्येच येत आहे कार्ड
पीटरने सांगितले की, माझं कार्ड डिसेंबर महिन्यात एक्सपायर झालं होतं. तेव्हापासूनच एकापाठी एक कार्ड घरी येत आहेत पीटरने आपल्या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये लोकांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली आहेत. पीटरने सांगितले की, त्याने याबाबत बॅंकेला सूचितही केलं आहे. पण कार्ड इन्शुरन्सचं काम थर्ड पार्टी बघते आणि त्यांच्यापर्यंत सूचना पोहोचली नाही. खास बाब ही आहे की पीटरला जे कार्ड मिळाले आहे त्यांची एक्सपायरी सतत वाढत गेली.
कॅन्सल करावं लागलं कार्ड
पीटरने सांगितले की, गेल्या आठवड्यात त्याने बॅकेला सूचित करून आपलं डेबिट कार्ड बंद केलं. ज्यानंतर त्यानंतर त्याला नवीन कार्ड मिळणं बंद झाले. पण त्याच्याकडे असलेल्या ६४ डेबिट कार्ड्सपैकी एकही त्याच्या कामाचं नाही.