ऐकावं ते नवलच! मृत्यूच्या 5 तासानंतर जिवंत झाली व्यक्ती, सांगितल्या निधनानंतरच्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 09:15 AM2018-04-23T09:15:40+5:302018-04-23T09:15:40+5:30

मृत्यू झाल्यानंतर व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याचं आपण फक्त गोष्टींमध्ये ऐकलं आहे.

man got up after 5 hours of die | ऐकावं ते नवलच! मृत्यूच्या 5 तासानंतर जिवंत झाली व्यक्ती, सांगितल्या निधनानंतरच्या गोष्टी

ऐकावं ते नवलच! मृत्यूच्या 5 तासानंतर जिवंत झाली व्यक्ती, सांगितल्या निधनानंतरच्या गोष्टी

googlenewsNext

अलीगड- मृत्यू झाल्यानंतर व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याचं आपण फक्त गोष्टींमध्ये ऐकलं आहे. पण उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये ही घटना घडली आहे. तेथे एक व्यक्ती त्याच्या निधनानंतर 5 तासाने जिवंत झाला.  अलीगडच्या अतरोलीमधील किरथल गावात राहणाऱ्या रामकिशोर यांचं काही दिवसांपूर्व निधन झालं. तब्येत व्यवस्थित असताना रामकिशोर यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या संपूर्ण परिवाराला धक्का बसला. रामकिशोर यांच्या मृत्यूची वार्ता सर्व नातेवाईकांना देण्यात आली. त्यानंतर सर्वांनी घरी यायलाही सुरूवात केली. 

रामकिशोर यांच्यावर अंतिम संस्कार करण्याची तयार सुरू असताना अतानक मृताच्या शरीरात हालचाल पाहायला मिळाली. हे पाहून तेथे असणारे सर्वच जण हैराण झाले. मृत्यू झालेले रामकिशोर अचानक उठून बसले. 'मी एकदम ठीक आहे. चुकून मला घेऊन गेले होते, आता परत पाठवल', असं रामकिशोर आंनी म्हटलं. 

रामकिशोर अचानक उठल्याने त्यांच्या घरातील वातावरण क्षणात बदलून गेलं. त्या पाच तासात नेमकं काय घडलं? या सर्वांना जाणून घेण्याची उत्सुकता होती.  निधन झाल्यानंतर 5 तासात काय घडलं? त्याबद्दलचा घटनाक्रम रामकिशोर यांनी सांगितला. 5 तासापैकी जास्त मला आठवत नाही. पण काही गोष्टी सांगता येतील. 'मी जेथे गेलो होतो तेथे एक बैठक सुरू होती. काही दाढीवाले महात्मा त्यांच्या वरिष्ठांशी बोलत होते. त्याचदरम्यान एका वृद्ध व्यक्तीने माझ्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. याला इथे का आणलं, अजून वेळ आहे, असं त्या वृद्ध व्यक्तीने म्हटलं. यानंतर लगेचच मला एक धक्का लागल्या सारखं झालं आणि जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी तुम्हाला रडताना पाहिलं, अशी माहिती रामकिशोर यांनी दिली. 

Web Title: man got up after 5 hours of die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.