कोरोना झालेल्या व्यक्तीचं हॉस्पिटलमध्येच लावून दिलं लग्न, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 11:27 AM2020-08-22T11:27:05+5:302020-08-22T11:32:36+5:30
41 वर्षीय Carlos Muniz त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत लग्न करणार होता. पण त्याला कोरोना झाला. त्यामुळे त्याला गर्लफ्रेन्डपासून वेगळं व्हावं लागलं. त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं.
कोरोना व्हायरसमुळे जग जवळपास बंद झालं आहे. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण लॉकडाऊन असूनही दोन प्रेम करणाऱ्यांना एक होण्यापासून कुणी रोखू शकलं नाही. आता हेच कपल बघा ना. 41 वर्षीय Carlos Muniz त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत लग्न करणार होता. पण त्याला कोरोना झाला. त्यामुळे त्याला गर्लफ्रेन्डपासून वेगळं व्हावं लागलं. त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं.
people.com ने दिलेल्या वृत्तानुसार, ११ ऑगस्टला दोघांनी लग्न केलं. हॉस्पिटलमधीलच एका नर्सने त्याला मोटिवेट केलं होतं. त्यानंतर कार्लोस ग्रेससोबत बोलला. त्याने तिला सांगितले की, त्याला हॉस्पिटलमध्ये लग्न करायचं आहे.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये San Antonio's हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांनीच लग्नाची सर्व अरेंजमेंट केली होती. तसेच दोघांचे फॅमिली मेंबर्सही लग्नात सहभागी झाले होते. जे येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी लाइव्ह स्ट्रीमिंग करण्यात आलं होतं. कार्लोसच्या नर्सने सांगितले की, हे लग्न त्याच्यासाठी आणि हॉस्पिटलसाठी फार महत्वाचं आहे. या लग्नाने सांगितले की, कोरोना प्रेम करणाऱ्यांना रोखू शकत नाही.
कार्लोस सध्या कोरोनातून बरा होत आहे. त्याला स्वत:हून श्वास घेता येत आहे. डॉक्टर आणि नर्सेसचं मत आहे की, तो लवकरच बरा होईल. म्हणजे हे बघायला मिळालं की, कोरोनाने आपल्याला हैराण केलंय तर दुसरीकडे कार्लोज आणि ग्रेससारखे काही लोकही आहेत ज्यांचं प्रेम लोकांना प्रोत्साहित करत आहे.
हे पण वाचा :
काय सांगता! तब्बल २२ कोटी रूपयांना विकल्या गेल्या या मोडक्या-तोडक्या खुर्च्या, पण का रे भौ?
हैद्राबादच्या 'या' राजकुमारीच्या सौंदर्याची जगभरात होती चर्चा, हॉलिवूडमधूनही मिळाल्या होत्या ऑफर....