या व्यक्तीने अंगावर गोंदवली 600 हून अधिक शहीदांची नावे, कारण जाणून अभिमानाने छाती फुगेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2022 12:27 PM2022-04-05T12:27:00+5:302022-04-05T12:36:37+5:30
600 names martyrs tattooed on the body : हापूर येथे राहणारे इंटिरियर डिझायनर पंडित अभिषेक गौतम (Pandit Abhishek Gautam) यांनी एक अनोखी कामगिरी केली आहे. त्यांनी आपल्या शरीरात ६०० हून अधिक शहीदांची नावे कोरली आहेत.
शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बहुतेक लोक त्यांच्या फोटोंसमोर फुले अर्पण करतात किंवा दिवे लावतात. मात्र, एका व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचे वेड आहे. हापूर येथे राहणारे इंटिरियर डिझायनर पंडित अभिषेक गौतम (Pandit Abhishek Gautam) यांनी एक अनोखी कामगिरी केली आहे. त्यांनी आपल्या शरीरात ६०० हून अधिक शहीदांची नावे कोरली आहेत.
६३१ शहीदांची नावे
अभिषेक गौतम हे सध्या रसुलपूर, बधरिया येथे इंटिरियर डिझायनिंगचे काम करत आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या शरीरावर ६३१ शहीदांची नावे गोंदवण्यात आली आहेत. असे करून त्यांनी स्वत:चे फिरते हुतात्मा स्मारक बनवले आहे. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, अभिषेक यांनी सांगितले की, एकूण ६३१ शहीदांपैकी ५५९ नावे कारगिलमधील शहीदांची आहेत.
केवळ नावेच नाही तर फोटो आणि स्मारकेही गोंदवली आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक गौतम हे मार्च 2021 पासून सिवानमध्ये राहत असून त्याच्या शरीरावर शहीदांची नावे तसेच फोटो, इंडिया गेट आणि शहीद स्मारक कोरलेली आहे. जेव्हा जेव्हा लोक त्यांचे शरीर पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात, कारण अभिषेक गौतम यांच्यासारखे क्वचितच लोक पाहिले जातात.
या कामगिरीनंतर अभिषेक यांनी 'ही' व्यक्त केली इच्छा
कारगिलमधील शहीद जवानांपैकी छपरा येथील एकमाचे लान्स नाईक अरुण कुमार सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचेही अभिषेक यांनी सांगितले. आता एकमामध्ये अरुण कुमार सिंह यांचाही पुतळा उभारावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी तो अथक परिश्रम घेत आहे.