बाबो! हा आहे रिअल लाईफ स्पायडर मॅन, पाळले आहेत तब्बल १२० विषारी कोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 11:11 AM2022-03-10T11:11:15+5:302022-03-10T11:13:53+5:30

३४ वर्षांच्या एका व्यक्तीच्या स्पायडरवर असणाऱ्या प्रेमाबाबत ( Spider Lover ) ऐकल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल.

man have 120 spiders and own bedroom in the house | बाबो! हा आहे रिअल लाईफ स्पायडर मॅन, पाळले आहेत तब्बल १२० विषारी कोळी

बाबो! हा आहे रिअल लाईफ स्पायडर मॅन, पाळले आहेत तब्बल १२० विषारी कोळी

Next

एखाद्या माणसानी कुत्रा, मांजर, पोपट, कबुतर किंवा गाय, म्हैस, बैल असे प्राणी पाळल्याचे (PET) तुम्ही पाहिलं असेलच. पण घरात कोळी म्हणजेच स्पायडर (Spiders ) पाळल्याचं तुम्ही कधी पाहणं तर दूरच पण ऐकलंही नसेल. मात्र, ३४ वर्षांच्या एका व्यक्तीच्या स्पायडरवर असणाऱ्या प्रेमाबाबत ( Spider Lover ) ऐकल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल.

ॲरॉन फिनिक्स (Aaron Phoenix ) या व्यक्तीने एक दोन नव्हे तर तब्बल १२० स्पायडर त्याच्या घरात पाळले आहेत. त्यामुळे हा माणूस एकतर रियल स्पायडर-मॅन (Spider Man) आहे किंवा तो वेडा आहे, अशीच चर्चा सुरू झाली आहे. ॲरॉन फिनिक्सला स्पायडर इतके आवडतात की, त्याने त्याच्या घरात २-४ नव्हे तर १२० स्पायडर पाळले आहेत. त्यामुळेच लोक त्याला रिअल लाइफ स्पायडर-मॅन म्हणू लागले आहेत. कारण त्याने या स्पायडर्ससाठी घरातील एक वेगळी बेडरुम राखीव ठेवली आहे. जिथे हे सर्व स्पायडर असतात.

स्पायडर पाळण्याचं काम कोणीही सामान्य माणूस करू शकत नसला तरी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ॲरॉनला डिप्रेशन आणि काही मानसिक आजार आहेत. डॉक्टरांनी त्याला यातून बाहेर पडण्यासाठी जे आवडतं ते करायला सांगितलं. पण त्यावेळी डॉक्टरांच्या डोक्यात विचारसुद्धा आला नव्हता की, ॲरॉन हा स्पायडर पाळेल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ॲरॉनने स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी १२० दक्षिण अमेरिकन स्पायडर घरात ठेवले. आता त्याच्या घरात स्पायडरच स्पायडर फिरताना दिसतात. ॲरॉनचा दावा आहे की, या सर्वांसोबत राहून त्याला बरं वाटतं.

ॲरॉन फिनिक्स बायपोलर डिसऑर्डर आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळेच त्याने आपला छंद म्हणून स्पायडर पाळले आहेत. डॉक्टरांनी तसे स्पष्ट केले आहे. स्पायडर्ससाठी त्याने घरात स्वतंत्र बेडरूम दिली आहे. कोणी काहीही बोलले तरी ही त्याची आवड असल्याचा दावा तो करतो. डॉक्टरांनी मला माझ्या छंदावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले, आणि त्याचा फायदा होत असल्याचे तो सांगतो.

तो तासनतास स्पायडर्सकडे टक लावून पाहतो. त्यातून खूप सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचा दावाही तो करतो. मेट्रोच्या रिपोर्टनुसार, ॲरॉन त्याच्या कुटुंबासोबत एकाच घरात राहतो. सुरुवातीला कुटुंबातील इतर सदस्यांना स्पायडर्सची भीती वाटत होती, पण आता त्यांनाही त्यांची सवय झाली आहे. आनंदी राहण्यासाठी स्वतःचा छंद जोपासण्यास अनेकदा सांगितलं जातं. परंतु, ॲरॉन याचा छंद हा खूपच विचित्र असून, त्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

Web Title: man have 120 spiders and own bedroom in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.