२८ वर्षीय तरूणाने उंची वाढण्यासाठी केला हा कारनामा, २ इंचासाठी आलेला खर्च वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 11:38 AM2021-01-21T11:38:18+5:302021-01-21T11:41:23+5:30
अल्फांसो फ्लोरेसची उंची आधी ५ फूट ११ इंच होती आणि त्याने आता कॉस्मेटिक सर्जरी करून आपली उंची २ इंचाने वाढवली आहे.
नेहमीच लोक आपली उंची वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. एक्सरसाइजसोबतच खाण्या-पिण्यातही बदल करतात. पण अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका २८ वर्षीय अल्फांसो फ्लोरेसने वेगळंच पाउल उचललं आणि यासाठी कॉस्मेटिक सर्जरीची मदत घेतली.
कॉस्मेटिक सर्जरीने वाढवली २ इंच उंची
अल्फांसो फ्लोरेसची उंची आधी ५ फूट ११ इंच होती आणि त्याने आता कॉस्मेटिक सर्जरी करून आपली उंची २ इंचाने वाढवली आहे. आता अल्फांसोची उंची ६ फूट १ इंच झाली आहे.
२ इंचासाठी किती आला खर्च?
अल्फांसो फ्लोरेसला १२ वर्षांचा असतानापासून जास्त उंची हवी होती आणि त्याला त्याची उंची बास्केटबॉल खेळाडूंसारखी हवी होती. आता त्याला २८ व्या वयात उंची वाढवण्यासाठी ७५ हजार डॉलर म्हणजे ५५ लाख रूपये खर्च करावे लागले.
परिवाराने दिला होता नकार
उंची वाढवण्यासाठी अल्फांसो फ्लोरेसने कॉस्मेटिक लिंब सर्जरी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याच्या या निर्णयाला परिवारातून नकार मिळाला होता. मित्रांनीही त्याला खूप समजावले. पण उंच होण्याच्या त्याच्या इच्छेसाठी त्याने सर्जरीची मदत घेतली.
६९ लाखांपर्यंत येऊ शकतो खर्च
डेलीमेलनुसार, अल्फांसो फ्लोरेसची ही सर्जरी लास वेगास येथील लिंबप्लास्ट एक्स इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर केविन देविप्रसाद यांनी केली. त्यांनी सांगितले की, या ऑपरेशनचा सुरूवातीचा खर्च ७५ हजार डॉलर म्हणजे ५५ लाख रूपये येतो. जर यात काही वेगळं हवं असेल तर त्याचा खर्च ९४ हजार डॉलर म्हणजे ६९ लाखांपर्यंत जाऊ शकतो.
सर्जरीने किती उंची वाढू शकते
डॉक्टर देवीप्रसाद यांनी सांगितले की, कॉस्मेटिक लिंब सर्जरी एक अशी सर्जरी आहे ज्यात फीमर(मांडीचं हाड) किंवा टिबिया(तळपायाचं हाड) लांब केलं जातं. या सर्जरीतून व्यक्ती उंची सहा इंचापर्यंत वाढवता येऊ शकते.