शाब्बास रे पठ्ठ्या! कारमधून २ वर्षांची मुलगी नदीत पडली, पठ्ठ्याने तिला वाचवण्यासाठी घेतली उडी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 04:48 PM2021-05-05T16:48:38+5:302021-05-05T16:50:29+5:30
एका कारमधून एक चिमुकली पुलावरून नदीत पडली. अशात तिथे असलेल्या एका व्यक्तीने लगेच सुपरहिरोप्रमाणे नदीत उडी घेतली आणि त्या चिमुकलीचा जीव वाचवला.
अनेकदा असे काही लोक असतात जे येतात आणि तुम्हााला अडचणीतून बाहेर काढून निघून जातात. अमेरिकेतील मेरीलॅंडमध्ये ओशियन सिटी ब्रिजवर एक घटना झाली होती. इथे अनेक गाड्यांची आपसात टक्कर झाली. अशातच एका कारमधून एक चिमुकली पुलावरून नदीत पडली. तिचं वय २ वर्षे असेल. अशात तिथे असलेल्या एका व्यक्तीने लगेच सुपरहिरोप्रमाणे नदीत उडी घेतली आणि त्या चिमुकलीचा जीव वाचवला.
रविवारी झालेल्या या घटनेत ८ लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. एका कार तर पुलावर लटकली होती. Ryan Whittington जे फायरफायटर आहेत त्यांनी याची माहिती CNN ला दिली.
(Ocean City, Maryland)After an accident on Rt90 bridge Sun afternoon sent a 2-yr-old into the water, a bystander didn’t hesitate to jump off bridge into the Assawoman Bay to rescue her. Hero prefers to remain anonymous & the child is in stable condition at Johns Hopkins Hospital. pic.twitter.com/nDryGpU7w4
— GoodNewsCorrespondent (@GoodNewsCorres1) May 4, 2021
Whittington म्हणाले की, ज्या व्यक्तीने मुलीचा जीव वाचवला त्याने त्याचं नाव सांगितलं नाही. फायर डिपार्टमेंटने त्याला 'Humble Hero' असं नाव दिलं. या दुर्घटनेदरम्यान ही व्यक्ती पुलावरून त्याच्या कारने जात होती. त्याच्या कारचंही यात नुकसान झालं. पण जसं त्याने लहान मुलीला पाण्यात पडताना पाहिलं. त्यानेही उडी घेतली.
या व्यक्तीने मुलीचा जीव वाचवण्यासाठी कशाचाही विचार न करता २५ फूट खोल पाण्यात उडी घेतली. नंतर रेक्स्यू करणाऱ्या टीमने मुलीला आणि त्या व्यक्तीला बाहेर काढलं. मुलीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल आहे. ती आता ठीक आहे.