पत्नीच्या दोन बहिणींसोबत पतीने केलं लग्न, आता चौघेही एकाच घरात राहतात एकत्र....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 01:55 PM2022-09-19T13:55:49+5:302022-09-19T13:56:44+5:30

आश्चर्याची बाब म्हणजे या तिन्ही महिला बहिणी आहेत. लग्नानंतर तिघीही एकाच घरात एकत्र राहतात. या परिवारात एकूण 14 लोक आहेत. ज्यात 10 लहान मुलं आहेत. 

Man lives with three wives in house woman share husband | पत्नीच्या दोन बहिणींसोबत पतीने केलं लग्न, आता चौघेही एकाच घरात राहतात एकत्र....

पत्नीच्या दोन बहिणींसोबत पतीने केलं लग्न, आता चौघेही एकाच घरात राहतात एकत्र....

Next

जगभरात सतत विचित्र घटना घडत असतात, कधी त्यांवर विश्वास बसत नाही तर कधी त्या हैराण करणाऱ्या असतात. प्रेमसंबंध किंवा नात्यांबाबत तर फारच अनोख्या घटना समोर येत असतात. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका व्यक्तीने तीन महिलांसोबत लग्न केलं. आश्चर्याची बाब म्हणजे या तिन्ही महिला बहिणी आहेत. लग्नानंतर तिघीही एकाच घरात एकत्र राहतात. या परिवारात एकूण 14 लोक आहेत. ज्यात 10 लहान मुलं आहेत. 

एका गावात राहणारा ओमबेनी Polygamy रिलेशनशिपमध्ये आहे. त्याच्या क्रिस्टीन, एलीन आणि टूमा नावाच्या तीन पत्नी आहेत. जेव्हा त्याने एलीन आणि टूमासोबत लग्न केलं तेव्हा त्याची पहिली पत्नी क्रिस्टीनने याचा विरोध केला नाही. उलट तिने ओमबेनीच्या इतर दोन लग्नाचं समर्थन केलं.
यूट्यूब चॅनल Afrimax English सोबत बोलताना ओमबेनी याने सांगितलं की, तीन पत्नी असल्यामुळे लोक त्याच्याबाबत काहीही बोलतात. पण त्याला याने काही फरक पडत नाही. ओमबेनी म्हणाला की, आम्ही एकत्र आनंदी आहोत आणि आमच्यासाठी हे जास्त महत्वाचं आहे.

ओमबेनीने सांगितलं की, त्याच्या तिन्ही पत्नी त्याला खूप सपोर्ट करतात. त्यांच्यात नातं चांगलं आहे. घरातील कामे आणि मुलांचा सांभाळ त्या मिळून करतात. कुणातच वाद होत नाहीत. तिघीही एकमेकींचा सन्मान करतात आणि पती ओमबेनीवर एकसारखं प्रेम करतात.

जेव्हा ओमबेनीने पहिली पत्नी क्रिस्टीनकडे दुसरं लग्न करण्याचा विषय काढला तेव्हा तिने नकार दिला नाही. क्रिस्टीनने त्याला एलीनसोबत लग्न करण्याची परवानगी दिली. त्याचप्रमाणे जेव्हा ओमबेनीने टूमासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा क्रिस्टीन आणि एलीनने नकार दिला नाही. 

दरम्यान एका छोट्या आणि कच्च्या घरात आल्यावर टूमाला थोडी अडचण होती. तिला ओमबेनीच्या इतर पत्नीबाबतही माहीत नव्हतं. पण जेव्हा क्रिस्टीन आणि एलीनने टूमाचं मनापासून स्वागत केलं तेव्हा टूमाला चांगलं वाटलं. तेव्हा ती एकत्र एका घरात राहण्यास तयार झाली. चौघांचंही मत आहे की, कधीना कधी गोष्टी बदलतील. त्यासाठी ते प्रयत्न करत राहणार.

ज्याप्रकारे ओमबेनीने तीन पत्नी आणि मुलांना सांभाळलं, क्रिस्टीन ओमबेनीचं खूप कौतुक करते. भलेही त्यांचं जीवन गरिबीत जात असेल, पण ते त्यांच्या जीवनात आनंदी आहेत.
 

Web Title: Man lives with three wives in house woman share husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.