बाबो! ज्या मुलीने त्याला केलं होतं रिजेक्ट, बॉडी बनल्यावर तिनेच डेटसाठी केली विचारणा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 02:36 PM2019-10-04T14:36:55+5:302019-10-04T14:44:55+5:30
कधी-कधी जीवनात अशा काही गोष्टी घडून जातात ज्याने माणूस पेटून उठतो. त्या गोष्टींमधून त्याला काहीतरी करून दाखवण्याची, लोकांना उत्तर देण्याची हिंमत येते.
कधी-कधी जीवनात अशा काही गोष्टी घडून जातात ज्याने माणूस पेटून उठतो. त्या गोष्टींमधून त्याला काहीतरी करून दाखवण्याची, लोकांना उत्तर देण्याची हिंमत येते. असंच काहीसं एंथनी बेयरसोबत झालं. एंथनी बेयर शाळेत असताना त्यांचं वजन १५७ किलो होतं. त्यावेळी त्याचं एका मुलीवर प्रेमही होतं. पण त्या मुलीने त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला. एंथनी लठ्ठ असल्याने तिने त्याला रिजेक्ट केलं. त्याचा अपमान केला. पण हीच घटना एंथनीचं आयुष्य बदलणारी ठरली. त्याने वजन कमी करण्याचा निश्चय केला. त्याने जिम सुरू केलं, मेहनत घेतली आणि वजन कमी केलं. आता ज्या मुलीने त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला होता, त्याच मुलीचा त्याला डेटवर जाण्यासाठी मेसेज आलाय.
एंथनीने जेव्हा फिट झाला आणि त्याने बॉडी बनवली तेव्हा त्याला त्याच मुलीचा मेसेज आला. तिने शाळेत एंथनीसोबत केलेल्या वाईट व्यवहाराबाबत माफीही मागितली. तिने एंथनीला डिनरला जाण्यासाठी विचारले. इतकेच नाही तर ती एंथनीला 'तू हॉट दिसतोस' असंही म्हणाली.
२६ वर्षीय एंथनीला वाढत्या लठ्ठपणामुळे डॉक्टरांनी इशारा दिला होता. डॉक्टर्स त्याला म्हणाले होते की, असंच वजन वाढत राहिलं तर त्याला अनेक आजार होतील. त्यामुळे त्यानेही वजन कमी करण्याचा निश्चय केला.
एंथनी नंतर जिम जॉइन केलं. डाएटमध्ये बदल केला. याचा परिणाम असा झाला की, एंथनीने ६० किलो वजन कमी केलं. आधी तो फार जास्त फास्ट फूड खात होता. जिम जॉइन केल्यानंतर डाएट प्लॅन तयार केला. त्याने हा डाएट प्लॅन काटेकोर फॉलो केला.
शाळेत एंथनी ज्या मुलीला पसंत करत होता, त्याला तिच्यासोबत डान्स करण्याची इच्छा होती. पण त्या मुलीने त्याला थेट नकार दिला. इतकेच नाही तर त्याच्या लठ्ठपणाची तिने खिल्ली देखील उडवली.
एंथनी सांगतो की, त्याला त्या मुलीसोबत डेटवर जाण्यास काहीच अडचण नाहीये. तो म्हणाला की, 'ती सॉरी म्हणाली. इतकेच काय तर शाळेत जे माझी गंमत करत होते, आजही ते आनंदाने भेटतात. माझ्या मनात कुणाबाबत काही वाईट नाही'.
एंथनी सांगतो की, जेव्हा तो लठ्ठ होता, तेव्हा त्याचे केवळ तीन टिंडर मॅच होते. आज त्याचे १ हजारांपेक्षा जास्त टिंडक मॅच आहेत. अनेक मुली आता त्याला डेटवर जाण्यासाठी मेसेज करतात.
एंथनीने आता 'ट्रान्सफॉर्म युअर फ्यूचर' नावाने एक ट्रेनिंग बिझनेस सुरू केला आहे. यात लोकांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे फिट राहण्याचं ट्रेनिंग दिलं जातं.