ऐकावं ते नवलंच..! कँसरने डोळा गेला, या पठ्ठ्याने डोळ्याच्या जागी चक्क फ्लॅशलाइट बसवला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 09:02 PM2022-11-17T21:02:13+5:302022-11-17T21:12:34+5:30

या पठ्ठ्याने डोळा गमावला, तिथे विविध रंगाचे फ्लॅशलाईट बसवले.

Man lost eye due to Cancer, he installed a flashlight in eye | ऐकावं ते नवलंच..! कँसरने डोळा गेला, या पठ्ठ्याने डोळ्याच्या जागी चक्क फ्लॅशलाइट बसवला

ऐकावं ते नवलंच..! कँसरने डोळा गेला, या पठ्ठ्याने डोळ्याच्या जागी चक्क फ्लॅशलाइट बसवला

Next

'आपदा को अवसर बनाओ' असे अनेकदा म्हटले जाते. याचा अर्थ असा की, कठीण परिस्थितीमध्येही पर्याय शोधले पाहिजे. असेच काहीसे
दक्षिणी कैलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या एका इंजीनिअरने केले आहे. ब्रायन स्टॅनले (Brain Stanley) असे याचे नाव असून, हा एक प्रोटोटाइप मेकॅनिस्टदेखील आहे. ब्रायनसोबत असा अपघात झाला, ज्यामुळे त्याचे आयुष्य बदलले.

ब्रायनला कँसरसारखा आजार झाला आणि यामुळे त्याला एक डोळा गमवावा लागला. डोळ्याची जागा रिकामी होती, त्यामुळे त्याने तिथे एक अशी वस्तू बसवली, ज्यामुळे त्याचा चेहरा एखाद्या रोबोटसारखा दिसू लागला. टर्मिनेटर चित्रपटात अर्नॉल्ड श्वार्जनेगरचा डोळा जसा चमकतो, तशाच प्रकारचे एक फ्लॅशलाइट (Flashlight) म्हणजेच टॉर्च ब्राययने डोळ्यात बसवली. त्याने स्वतः ही टॉर्च बनवली आहे. 

ब्रायनने वेगवेगळ्या रंगाच्या टॉर्च बनवल्या आहेत. त्या टॉर्चचा प्रकाश इतका पडतो, ज्या अख्खी खोली प्रकाशमान होते. ब्रायनने या टॉर्चला टायटेनियम स्कल लँप (Titanium Skull Lamp) असे नाव दिले आहे. ब्रायन सांगतो की, या टायटेनियम स्कल लँपद्वारे तुम्ही अभ्यास करू शकता, अंधाऱ्या भागात पाहू शकता. विशेष म्हणजे, ब्राययने घरातल्या वस्तुंचा वापर करुन ही टॉर्च लाईट बनवली आहे. 

Web Title: Man lost eye due to Cancer, he installed a flashlight in eye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.