एकावं ते नवलच! पार्कमध्ये फिरायला गेला अन् म्हणतोय माझा पायच हरवला, शोधणाऱ्याला बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 05:21 PM2022-03-14T17:21:14+5:302022-03-14T17:50:20+5:30

इथं कुणी व्यक्ती किंवा वस्तू नाही तर चक्क एका व्यक्तीचा पायच हरवला आहे (Man lost leg in park). सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे पोस्टर पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

man lost his prosthetic leg in park when he went for walk | एकावं ते नवलच! पार्कमध्ये फिरायला गेला अन् म्हणतोय माझा पायच हरवला, शोधणाऱ्याला बक्षीस

एकावं ते नवलच! पार्कमध्ये फिरायला गेला अन् म्हणतोय माझा पायच हरवला, शोधणाऱ्याला बक्षीस

Next

एखादी व्यक्ती हरवली आहे किंवा एखादी वस्तू हरवली आणि ती शोधून देण्याऱ्याला बक्षीस मिळणार, अशा जाहिरातीचे पोस्टर तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिले असतील. सध्या अशाच एक जाहिरातीने सर्वांचं लक्ष वेधून घेतली आहे. पण इथं कुणी व्यक्ती किंवा वस्तू नाही तर चक्क एका व्यक्तीचा पायच हरवला आहे (Man lost leg in park). सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे पोस्टर पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

एक व्यक्ती पार्कमध्ये फिरायला गेली आणि या व्यक्तीचा पायच हरवला. आपला पाय कुठे गायब झाला, हे या व्यक्तीलाही माहिती नाही. आता आपला पाय शोधण्यासाठी या व्यक्तीने लोकांची मदत मागितली आहे. यूकेतील हे विचित्र प्रकरण आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार ब्रिटनच्या वेस्ट ससेक्समध्ये राहणारी व्यक्ती पार्कमध्ये फिरायला गेली, तेव्हा तिच्यासोबत एक दुर्घटना घडली. पार्कमध्ये फिरता फिरता त्या व्यक्तीचा पाय (Prosthetic Leg)  हरवला. त्याने आपले पाय हरवल्याचं पोस्टर जारी केलं आहे.

पाय शोधून देणाऱ्याला त्याने बक्षीसही जारी केलं आहे.  हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या पोस्टरच्या मागे त्याच पार्कचं बॅकग्राऊंड आहे, जिथं त्याचा पाय हरवला आहे. त्याने या पार्कमधील एका झाडावर पोस्टर लावलं आहे. व्यक्तीने आपला हरवलेला कृत्रिम पाय शोधण्यासाठी लावलेलं हे पोस्टर पाहिल्यानंतर सर्वजण हैराण झाले आहेत.

कृत्रिम पाय निघाला तरी या व्यक्तीला कसं समजलं नाही, याबाबत बहुेतकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. काही नेटिझन्सनी कृत्रिम पाय निघणं आणि त्या व्यक्तीला त्याची माहितीच नसणं, असं होऊ शकत नाही असं म्हणत काही युझर्नली याला पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे. पाय हरवण्याची ही पहिली घटना नाही. याआधी अमेरिकेत ४७ वर्षांच्या व्यक्तीने आपले दोन्ही कृत्रिम पाय स्कायडायव्हिंगवेळी गमावले होते. एका शेतकऱ्याच्या शेतात ते सापडले.

Web Title: man lost his prosthetic leg in park when he went for walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.