ऑफिस टॉयलेटमध्ये केला असा कारनामा, नोकरीचा पहिला दिवस ठरला शेवटचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 10:41 AM2024-02-16T10:41:42+5:302024-02-16T10:42:11+5:30

एका व्यक्तीने नोकरीच्या पहिल्या दिवशीच ऑफिसमध्ये असं काम केलं की, त्याची नोकरीच गेली.

Man lost job on first day clogged toilet with poop | ऑफिस टॉयलेटमध्ये केला असा कारनामा, नोकरीचा पहिला दिवस ठरला शेवटचा!

ऑफिस टॉयलेटमध्ये केला असा कारनामा, नोकरीचा पहिला दिवस ठरला शेवटचा!

सामान्यपणे नोकरीच्या पहिल्या दिवशी कुणीही आपल्या बॉसवर आणि सहकाऱ्यांवर आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असतो. चांगले कपडे, शूज, घालून जातात. पण एका व्यक्तीने नोकरीच्या पहिल्या दिवशीच ऑफिसमध्ये असं काम केलं की, त्याची नोकरीच गेली. याबाबत त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर पोस्ट टाकून माहिती दिली.

मिरर वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, रेडिटवर एक ग्रुप आहे r/h3h3productions. यावर एका व्यक्तीने पोस्ट शेअर केली आणि नंतर डिलीट केली होती. मिररनुसार, त्याने सांगितलं की, नोकरीच्या पहिल्या दिवशी एचआरकडून वेगवेगळी माहिती जाते आणि कागदपत्रांवर सही घेतली जाते. याच दिवशी व्यक्तीने अशी चूक केली की, त्याचा नोकरीचा पहिला दिवसच शेवटचा ठरला.

टॉयलेटमध्ये गेला आणि...

त्याने सांगितलं की, त्याला ऑफिस दाखवलं जात होतं. तेव्हाच त्याला टॉयलेटला जावं लागलं. बाथरूम फारच स्वच्छ आणि सुंदर होतं. टॉयलेट केल्यावर त्याचं लक्ष बाथरूमवरच होतं. त्यानंतर त्याने हात धुतले आणि तो बाहेर आला. एका डेस्कवर जाऊन तो पुन्हा पेपर वर्क करू लागला. काही वेळाने एक महिला सहकारी बाथरूममध्ये गेली. ऑफिसमध्ये बाथरूम एकच होतं त्यामुळे पुरूष आणि महिला त्याचा वापर करत होते. जशी महिला आत गेली ती वेडंवाकडं तोंड करत बाहेर आली. 

व्यक्तीच्या लक्षात आलं की, तो फ्लश करायला विसरला होता. त्याने लगेच स्वत:ला पेपर वर्कमध्ये बिझी असल्यासारखं दाखवलं. पण सगळ्यांना माहीत होतं की, तोच ऑफिसमध्ये नवीन आहे आणि काही वेळाआधी तो बाथरूममध्ये गेला होता. त्याने तो कारनामा केला असेल. महिलेने लगेच एका दुसऱ्या सहकाऱ्याला याची माहिती दिली. हळूहळू ऑफिसमध्ये सगळ्यांना समजलं. 

फ्लश केल्यावर टॉयलेट सीटमधील पाणी खाली जाण्याऐवजी येऊ लागलं आणि खालची जागाही खराब झाली. सफाई कर्मचारी सायंकाळपर्यंत आला नाही. व्यक्तीच्या लक्षात आलं की, त्याचा बॉसही त्याच्यावर नाराज आहे. त्याने पेपर वर्क केलं आणि तो ऑफिसमधून गेला. त्याला वाटलं की, पेपर वर्क झाल्यावर त्याला लगेच काही दिवसात बोलवलं जाईल. पण त्याला परत बोलवण्यात आलं नाही. त्याने कॉल करून विचारणाही केली होती, पण त्याला काही उत्तर देण्यात आलं नाही. ज्यामुळे त्याने समजून घेतलं की, त्याची नोकरी गेली आहे.

Web Title: Man lost job on first day clogged toilet with poop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.