Gym मध्ये घाम गाळूनही बनली नाही बॉडी तर जुगाड करून दोन दिवसात मिळवले Six Pack

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 11:18 AM2023-02-13T11:18:12+5:302023-02-13T11:19:28+5:30

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती सिक्स पॅक अ‍ॅब्ससाठी दिवसरात्र मेहनत करतो. तरीही त्याला काही फरक दिसत नाही.

Man made a six pack in two days with this unique jugaad | Gym मध्ये घाम गाळूनही बनली नाही बॉडी तर जुगाड करून दोन दिवसात मिळवले Six Pack

Gym मध्ये घाम गाळूनही बनली नाही बॉडी तर जुगाड करून दोन दिवसात मिळवले Six Pack

Next

Desi Jugaad Video: जगभरात वजन वाढण्याची समस्या खूपच वाढली आणि त्यामुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लोक आता जिममध्ये जाऊ लागले आहेत. त्यांना पोटावरील चरबी कमी करून सिक्स पॅक अ‍ॅब्स हवे असतात. अनेक महिने किंवा वर्ष जाऊनही सगळ्याचं हे स्वप्न पूर्ण होतंच असं काही नाही. लोक यासाठी लाखो रूपये खर्च करण्यासाठीही तयार असतात. तरीही सिक्स पॅक्स मिळाले नाही तर ते निराश होतात. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती सिक्स पॅक अ‍ॅब्ससाठी दिवसरात्र मेहनत करतो. तरीही त्याला काही फरक दिसत नाही. त्यानंतर त्याने असं काही केलं ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. त्याने केवळ दोन दिवसात सिक्स पॅक अ‍ॅब्स तयार केले. आता तुम्ही म्हणाल की, केवळ दोन दिवसात कसं शक्य आहे? चला जाणून घेऊ.

या व्यक्तीने सिक्स पॅक अ‍ॅब्ससाठी एक प्लान केला. तो त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीकडे गेला आणि आपल्या समस्येबाबत सांगितलं. त्याने सांगितलं की, त्याला कसंही करून दोन दिवसात सिक्स पॅक अ‍ॅब्स हवे आहेत. तो टॅटू एक्सपर्ट बोलला आणि सांगितलं की, त्याला पोटावर सिक्स पॅक अ‍ॅब्स असलेला टॅटू हवा आहे. अर्ध्या दिवसात एकीकडे आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण टॅटू तयार केला. आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक यावर अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टावर dean.gunther ने शेअर केला आहे.

Web Title: Man made a six pack in two days with this unique jugaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.