'Black Alien' बनला तरूण, त्यानेच सांगितलं का केला स्वत:त इतका बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 09:22 AM2023-09-02T09:22:01+5:302023-09-02T09:22:53+5:30

एंथनीला त्याच्या ब्लॅक एलिअन प्रोजेक्टसाठी ओळखलं जातं. त्याने सांगितलं की, त्याने त्याच्या ट्रांसफॉर्मेशनचं 62 टक्के काम पूर्ण केलं आहे.

Man made himself black alien with extreme body modification and tattoo | 'Black Alien' बनला तरूण, त्यानेच सांगितलं का केला स्वत:त इतका बदल

'Black Alien' बनला तरूण, त्यानेच सांगितलं का केला स्वत:त इतका बदल

googlenewsNext

एका व्यक्तीने आपल्या शरीरात इतके बदल केले की, आता त्याला ओळखणंही अवघड झालं आहे. तो असं गेल्या 10 वर्षांपासून करत आहे. त्याने त्याच्या शरीरावर अनेक टॅटू काढले. तो म्हणतो की, त्याला टॅटूची सवय लागली आहे. ज्यामुळे आता लोक त्याला ब्लॅक एलिअन म्हणतात. त्याचं नाव एंथनी लोफ्रेंडो आहे. एंथनीला त्याच्या ब्लॅक एलिअन प्रोजेक्टसाठी ओळखलं जातं. त्याने सांगितलं की, त्याने त्याच्या ट्रांसफॉर्मेशनचं 62 टक्के काम पूर्ण केलं आहे.

डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, फ्रान्सचा राहणाऱ्या एंथनीला अजून पुढे थांबायचं नाहीये. त्याने नाक, कान आणि दोन बोटं कापली आहेत. डोळ्यांवर टॅटू बनवले आहेत. आता त्याने त्याच्या इन्स्टावर त्याचा 10 वर्ष जुना फोटो शेअर केला आहे. ज्यात तो ओळखायलाही येत नाहीये. त्याने फोटो शेअर करत लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की, त्याने त्याच्यात इतके बदल का केले. एंथनीला इन्स्टावर 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

त्याने फोटो शेअर करत कॅप्शनला लिहिलं की, तो 25 वर्षाचा असताना कसा दिसत होता आणि आता कसा दिसतो. तो म्हणाला की, अनेकांनी त्याला वेड्यात काढलं होतं. आता ब्लॅक एलिअन प्रोजेक्ट क्रांती 62 टक्के पूर्ण झाली आहे.

त्याच्या जुन्या फोटोत त्याच्या चेहऱ्यावर एकही टॅटू  नाही. फक्त एका कानात रिंग घातली आहे. पण त्याचा आताचा चेहरा फारच भीतीदायक आहे. आपल्यात केलेल्या या बदलांबाबत एका मुलाखतीत एंथनी म्हणाला की, तो आधी फार सुंदर दिसत होता. पण नंतर त्याला जाणीव झाली की, त्याने स्वत:त बदल करायला हवा. कारण हे त्याचं खरं शरीर नाहीये.

Web Title: Man made himself black alien with extreme body modification and tattoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.