शारीरिक संबंध ठेवताना व्यक्तीने केली 'ही' चूक, कोर्टाने सुनावली १२ वर्षांची शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 02:50 PM2019-04-27T14:50:49+5:302019-04-27T15:01:08+5:30

ब्रिटनमधील एक फारच विचित्र घटना समोर आली आहे. इथे एक व्यक्ती देहविक्री करणाऱ्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत होता.

Man making physical relationship with prostitute court sentenced jailed for 12 years | शारीरिक संबंध ठेवताना व्यक्तीने केली 'ही' चूक, कोर्टाने सुनावली १२ वर्षांची शिक्षा!

शारीरिक संबंध ठेवताना व्यक्तीने केली 'ही' चूक, कोर्टाने सुनावली १२ वर्षांची शिक्षा!

googlenewsNext

ब्रिटनमधील एक घटना समोर आली असून इथे एक व्यक्ती देहविक्री करणाऱ्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत होता, पण त्याने नियमांचं उल्लंघन करुन तिच्यासोबत जबरदस्तीने असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले. या कारणामुळे कोर्टाने त्या व्यक्तीला दोषी ठरवत १२ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.  

३५ वर्षीय हॉगबेन नावाच्या व्यक्तीने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवण्याआधीच हे ठरलं होतं की, तो कंडोमचा वापर करेल. पण त्याने तसं केलं नाही. त्याने पीडितेच्या सहमतीच्या अटीचं उल्लंघन केलं. २० वर्षीय पीडित तरुणी ही तक्रार घेऊन पोलिसात गेली.  त्यानुसार दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी बलात्काराच्या आरोपात त्या व्यक्तीला अटक केली. 

हॉगबेनने तरुणीकडून झालेल्या आरोपांचं खंडन केलं. पण ट्रायलनंतर त्याला दोषी ठरवण्यात आलं. दरम्यान, जेव्हा पीडित तरुणी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली होती, तेव्हा आरोपीने तिच्या आजी-आजोबांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. इतकेच नाही तर त्याला दोषी ठरवण्यात आल्यावर जेव्हा न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली त्यानंतर त्याने एका व्हिडीओच्या माध्यमातून न्यायाधिशांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

सुनावणीदरम्यान कोर्टाला आढळलं की, पीडित तरुणीने अ‍ॅडल्ट वर्कच्या वेबसाइटवर तिच्या सेवेची जाहिरात दिली होती. त्यात तिने सर्व अटींचा स्पष्ट उल्लेख केला होता. त्यात लिहिले होते की, ग्राहकांना सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल आणि आवश्यक वस्तूंचा वापर करावा लागेल. 

ही जाहिरात पाहूनच आरोपीने व्यक्तीला संपर्क केला होता. पण शारीरिक संबंध ठेवताना आरोपीने मधेच कंडोम काढून टाकला. याचा पीडितेने विरोध केला. पण तरी सुद्धा आरोपीने जबरदस्ती पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर दोन तास तिच्यासोबत राहूनही तिला आपोरीने पैसे दिले नाहीत. या आरोपीवर याआधीही अत्याचाराचे आरोप झालेले होते. आता त्याला १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Web Title: Man making physical relationship with prostitute court sentenced jailed for 12 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.