'या' व्यक्तीने ४ वर्षात केली तब्बल २८०० अनोळखी लोकांशी मैत्री, कारण वाचून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 12:32 PM2019-09-25T12:32:21+5:302019-09-25T12:37:43+5:30
सामान्यपणे लोक अनोळखी लोकांसोबत बोलणं पसंत करत नाहीत. तर दुसरीकडे अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये राहणारा एक व्यक्ती रोज कोणत्या ना कोणत्या अनोळखी व्यक्तीसोबत बोलतो.
(Image Credit : Instagram/Rob Lawless)
सामान्यपणे लोक अनोळखी लोकांसोबत बोलणं पसंत करत नाहीत. तर दुसरीकडे अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये राहणारा एक व्यक्ती रोज कोणत्या ना कोणत्या अनोळखी व्यक्तीसोबत बोलतो. असं करून त्याने केवळ चार वर्षात २८०० अनोळखी लोकांशी मैत्री केली. तसेच यामागचं कारण मनाला स्पर्शून जाणारं कारणही त्याने सांगितलं.
२८ वर्षीय रॉब लॉसेसने अनोळखी लोकांना भेटणे आणि त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रवास २०१५ पासून सुरू केला होता. तेव्हा त्याने १० हजार नव्या लोकांशी मैत्री करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं.
लॉसेस आधी एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्याची नेहमीच सवय होती की, तो नवनवीन लोकांशी ओळखी करत होता, पण कंपनीत काम सुरू केल्यापासून त्याला त्याच्या या सवयीसाठी वेळच मिळत नव्हता. नंतर त्याने २०१६ मध्ये नोकरी सोडली आणि पूर्णपणे अनोळखी लोकांशी मैत्री करण्याच्या कामाला लागला.
लॉसेसच्या दिवसाची सुरूवात ही जिमने होते. आणि त्यानंतर तो कमीत कमी चार अनोळखी लोकांना भेटतो. प्रत्येक अनोळखी व्यक्तीसोबत तो कमीत कमी एक तास वेळ घालवतो. त्यांना स्वत:बाबत सांगतो आणि त्यांच्याबाबतही जाणून घेतो.
अनोळखी लोकांसोबत ओळखी करण्याच्या कारणाबाबत लॉसेसने सांगितले की, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क करणं हा वेळ घालवण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. आपण जसजसे टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकत आहोत, आपला लोकांशी संपर्क तुटत चालला आहे. हेच कारण आहे की, लॉसेसने याची सुरूवात केली होती.