व्यक्तीने ऑर्डर केला होता १ लाख रूपयांचा iPhone 13, पार्सलमध्ये जे दिसलं ते पाहून बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 11:37 AM2021-12-28T11:37:54+5:302021-12-28T11:39:00+5:30

डेनियल कॅरोल नावाच्या ग्राहकाने iPhone 13 प्रो मॅक्सची आतुरतेने वाट बघत होता. कारण तो मिळण्यात त्याला आधीच दोन आठवड्यांचा उशीर झाला होता.  

Man online order an iphone 13 worth Rs 1 lakh you will be shocked to see what came inside the box | व्यक्तीने ऑर्डर केला होता १ लाख रूपयांचा iPhone 13, पार्सलमध्ये जे दिसलं ते पाहून बसला धक्का

व्यक्तीने ऑर्डर केला होता १ लाख रूपयांचा iPhone 13, पार्सलमध्ये जे दिसलं ते पाहून बसला धक्का

Next

Online Order Apple iPhone: ऑनलाईन ऑर्डरच्या कितीतरी विचित्र घटना आपण नेहमीच ऐकत असतो. अनेक महागड्या वस्तूंऐवजी भलत्याच वस्तू लोकांना पोहोचवल्या जातात. एका ऑनलाइन शॉपिंग साइटकडून कन्फ्यूजनची आणखी एक घटना समोर आली आहे. एका ग्राहकाला चांगलाच मोठा फटका बसलाय. त्याने ऑनलाइन १ लाख रूपयांचा आयफोन १३ मागवला होता, पण त्याऐवजी त्याला दोन चॉकलेट पार्सलमध्ये मिळाले. ही घटना इंग्लंडच्या लीड्सची आहे. डेनियल कॅरोल नावाच्या ग्राहकाने iPhone 13 प्रो मॅक्सची आतुरतेने वाट बघत होता. कारण तो मिळण्यात त्याला आधीच दोन आठवड्यांचा उशीर झाला होता.  

LADbible च्या रिपोर्टनुसार, जेव्हा त्याला ऑर्डरचं पार्सल मिळालं तेव्हा त्याला टॉयलेट रोलमध्ये गुंडाळलेले दोन व्हाइटओरिओ चॉकलेट बार मिळाले. जे बघून त्याला धक्का बसला. डेनिअल म्हणाला की, 'मी अॅप्पल वेबसाइटच्या माध्यमातून २ डिसेंबरला फोनची ऑर्डर दिली होती. डिलिव्हरीची तारीख १७ डिसेंबर होती. पार्सल वेळेवर न आल्याने तो निराश होऊन स्वत: वेअरहाउसमध्ये गेला. त्याने सांगितलं की, मी ट्रॅकिंग केलं आणि पार्सल घेण्यासाठी डेपोत गेलो. त्यांनी सांगितलं की, पार्सल शनिवारी मिळेल.

तो म्हणाला की, 'सोमवारी पार्सल घेण्यासाठी मी २४ मैल प्रवास केला. पार्सल मिळालं तेव्हा त्याची टेप सैल होती. पण वजन वाटल्याने मी काही कुणाला बोललो नाही. मी पॅकेट उघडलं. त्यात दोन स्वस्त चॉकलेट टॉयलेट रोल पेपरमध्ये गुंडाळलेले होते'. डेनिअलने त्याच्यासोबत घडलेली ही घटना ट्विटरवर शेअर केली. त्याने लिहिलं की, Apple च्या वेबसाइटवरून खरेदी केल्यानंतर डीएचएलकडून त्याला अजब अपडेट मिळाले होते.

ट्विटमध्ये त्याने लिहिलं की, 'गेल्या शुक्रवारी जेव्हा डिलिव्हरी होणार होती, तेव्हा डीएचएलकडून हैराण करणारे अपडेट मिळाले. आधी त्यांनी डिलिव्हरी 'इन' सांगितलं, मग 'लेट' सांगितलं. डीएचएलने उत्तर दिलं की, त्यांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे. डेनिअला रिप्लेसमेंट करण्यास सांगण्यात आलं आहे. 
 

Web Title: Man online order an iphone 13 worth Rs 1 lakh you will be shocked to see what came inside the box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.