बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 02:20 PM2020-08-03T14:20:53+5:302020-08-03T14:29:36+5:30

मीटिंग दरम्यान एका व्यक्तीच्या फोनवर मेसेज आला. हा मेसेज त्याने उघडला तर लगेच त्याला मीटिंगमधून बाहेर केलं गेलं

Man opened whatsapp message in office meeting vulgar sounds started coming loud later blamed it was goose honking | बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर

बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर

googlenewsNext

काही लोकांसोबत खरंच फार विचित्र अशा घटना घडतात. काही आश्चर्चकारक असतात तर काही लाजिरवाण्या. अशीच एक विचित्र घटना यूकेतील रेडिच टाउन हॉलमधून समोर आली आहे. इथे १०० लोकांच्या मीटिंगदरम्यान असं काही झालं ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. मीटिंग दरम्यान एका व्यक्तीच्या फोनवर मेसेज आला. हा मेसेज त्याने उघडला तर लगेच त्याला मीटिंगमधून बाहेर केलं गेलं. मजेदार बाब म्हणजे जेव्हा त्याला विचारपूस केली गेली तेव्हा त्याने सगळा दोष बदकावर लावला. सोबतच मीटिंगमधून बाहेर काढण्यासाठी काउन्सिलला माफीही मागण्यास सांगितले. चला जाणून घेऊ संपूर्ण घटना..

रेडिच टाउन हॉलमध्ये शंभर लोकांची मीटिंग सुरू होती. या मीटिंगमध्ये असलेल्या एका व्यक्तीच्या फोनवर अचानक मेसेज आला. हा मेसेज उघडून पाहणं त्याला चांगलंच महागात पडलं. या व्यक्तीचं नाव डेविड वेस्ट आहे. तो इलेक्ट्रिशिअन असून वार्डस्तरमध्ये राहतो. त्याच्या फोनवर आलेला मेसेज उघडल्यावर त्याला लगेच मीटिंगमधून बाहेर काढण्यात आलं.

डेविडने त्याला आलेला मेसेज उघडला तर संपूर्ण हॉलमध्ये अश्लील आवाज ऐकू येऊ लागला होता. कारण डेविडने हेडफोन लावला नव्हता. मेसेजमध्ये एका महिलेची क्लिप होती, ज्यात ती जोरजोरात अश्लील आवाज काढत होती. अचानक झालेल्या या घटनेमुळे डेविड हैराण झाले. त्याला समजलं नाही की, काय करावं? त्यानंतर ३० सेकंद हॉलमध्ये तोच आवाज येऊ लागला होता. त्यानंतर त्याला लगेच  मीटिंगमधून बाहेर काढण्यात आले. काउन्सिलने डेविडवर नियमांचं उल्लंघन करण्याबाबत तक्रार दाखल केली. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे यावर डेविडने दिलेलं उत्तर...

डेविडला विचारलं गेलं की, मीटिंगदरम्यान काय झालं? तर यावर तो उलट काउन्सिलवर भडकला. तो म्हणाला की, त्याने कोणतेही नियम तोडले नाही किंवा अश्लीलता पसरवली नाही. त्याच्या मोबाईलवर बदकाचा एक व्हिडीओ आला होता. जेव्हा  त्याने व्हिडीओ प्ले केला तेव्हा त्यातून बदकाच्या ओरडण्याचा आवाज येत होता. हा आवा सर्वांना  पॉर्न फिल्मचा आवाज वाटला. त्याने स्वत: चा बचाव करताना सांगितले की, चुकून हा व्हिडीओ मीटिंगदरम्यान प्ले झाला. पण त्याचा अश्लीलतेशी काहीही संबंध  नव्हता.

जेव्हा त्याला व्हिडीओ दाखवण्यास सांगण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, व्हिडीओ डिलीट केलाय. यावर विचारपूस करणारी टीमही हसायला लागली. अनेकांनी डेविड खोटं बोलत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले आम्ही तिथे होतो आणि तो आवाज बदकांना नव्हता. ती पॉर्न फिल्मच होती.

हे पण वाचा :

बोंबला! मजेसाठी 'त्याने' प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले असे काही, सीटी स्कॅन पाहून डॉक्टरही झाले हैराण.....

लॉकडाऊनमुळे भारतात अडकली परदेशी महिला, ३ महिन्यात करू लागली शेती अन् शिकली कन्नड भाषा!

Web Title: Man opened whatsapp message in office meeting vulgar sounds started coming loud later blamed it was goose honking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.