कमी किंमतीत खरेदी केलं जुनं घर, भींत तोडली तर मोठा 'खजिना' लागला हाती!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 01:38 PM2023-05-01T13:38:47+5:302023-05-01T13:39:02+5:30
भींत तोडल्यावर आता अनेक टीनच्या बॉटल्स सापडल्या. एक एक करून त्याने त्या उघडण्यास सुरूवात केली तर त्यातून नोटा निघाल्या.
आपलं स्वत:चं घेणं हे जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. लोक अशाच घराची निवड करतात ज्यातून त्यांना पुढे जाऊन फायदाही झाला पाहिजे. बरेच लोक जुनी घरं विकत घेतात आणि कमी खर्चात ते पुन्हा व्यवस्थित करून ते सुंदर बनवतात. परदेशात हे चलन जास्त आहे.
Toño Piñeiro नावाच्या एका बिल्डरने स्पेनच्या लुगोमध्ये एक घर खरेदी केलं. ज्याला तो रिटायरमेंट होम बनवणार होता. जेव्हा तो घराचं काम करत होता तेव्हा त्याला एका भींतीमध्ये असं काही सापडलं, ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल. भींतीच्या मागे सापडलेला खजिना पाहून तो स्तब्ध झाला.
भींत तोडल्यावर आता अनेक टीनच्या बॉटल्स सापडल्या. एक एक करून त्याने त्या उघडण्यास सुरूवात केली तर त्यातून नोटा निघाल्या. भींतीमागून निघालेल्या सगळ्या नोटांची किंमत £47,500 म्हणजे भारतीय करन्सीनुसार 47 लाख रूपयांपेक्षा जास्त असेल. अचानक सापडलेला खजिना पाहून टोनो अवाक् झाला. पण त्याला हे माहीत नव्हतं की, पुढे असं काही घडणार आहे ज्याने त्याचं स्वप्न तुटणार आहे.
टोनोला मिळालेला हा आनंद काही वेळांसाठीच होता. कारण काही वेळानेच त्याला समजलं की, त्याला सापडलेली रक्कम Spanish Pesetas आहे. 2022 मध्ये या नोटा बंद होऊन इथे यूरो करन्सी झाली होती. त्यामुळे या रक्कमेच्या बदल्यात ना त्याला यूरो मिळणार होते ना त्या नोटा चालणार होत्या. पण तरीही कसेतरी त्याने या पैशातून 30 लाख रूपये मिळवले. ज्यातून त्याने घराची छत बांधली. हे घर त्याने फेसबुकवर लिस्टींगच्या माध्यमातून खरेदी केलं होतं आणि 40 वर्षापासून तिथे कुणी राहत नव्हतं.