'डॉक्टर' बनून प्रेयसीला सहा वर्ष लुटलं, तिचे ३ कोटी रूपये केले लंपास!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 10:49 AM2024-07-03T10:49:23+5:302024-07-03T11:12:40+5:30

प्रेमात लोक आपली संपत्ती लुटवतात आणि प्रेमही लुटवतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा तरूणीबाबत सांगणार आहोत, जे वाचून तुम्हीही अवाक् व्हाल.

Man poses as doctor dupes girlfriend scooped out 3 crore rupees in China | 'डॉक्टर' बनून प्रेयसीला सहा वर्ष लुटलं, तिचे ३ कोटी रूपये केले लंपास!

'डॉक्टर' बनून प्रेयसीला सहा वर्ष लुटलं, तिचे ३ कोटी रूपये केले लंपास!

प्रेमात पडणारे लोक आंधळे होतात असं म्हटलं जातं. ते जर कुणाच्या प्रेमात पडले तर चूक-बरोबर त्यांना काही कळत नाही. एकप्रकारे ते एका वेगळ्याच विश्वात हरवून गेलेले असतात. पण अशातच अनेकांची फसवणूक  होते. अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे. इथे एका तरूणाने तरूणीची अशी काही फसवणूक केली ज्याचा तिने कधी विचारही केला नसेल.

प्रेमात लोक आपली संपत्ती लुटवतात आणि प्रेमही लुटवतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा तरूणीबाबत सांगणार आहोत, जे वाचून तुम्हीही अवाक् व्हाल. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, एका तरूणाने डॉक्टर बनून आपल्या प्रेयसीला लुटलं. तब्बल सहा वर्ष ही तरूणीला याचा थांगपत्ताही लागला नाही.

ही घटना शांघायमधील आहे. झांग नावाचा तरूण हॉटेलमध्ये काम करत होता. त्याची ओळख मॉलमध्ये काम करणाऱ्या हुआंग नावाच्या तरूणीसोबत झाली. ३ महिने डेटिंग केल्यावर ते रिलेशनशिपमध्ये आले. ६ वर्ष त्याने तरूणीला हेच सांगितलं की, तो ऑब्टेट्रिशियन-गायनोकॉलजिस्ट आहे. तरूण इतका सराईत खोटं बोलत होता किंवा वागत होता की, तरूणीला जराही शंका आली नाही. जेव्हा ती त्याला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी येते सांगत होती तेव्हा तो टाळाटाळ करायचा. या दरम्यान त्याने हुआंगकडून घरात गुंतवणूक करायच्या नावाने पैसेही घेतेल आणि या पैशातून तो जुगार खेळला. इतकंच नाही तर त्याने त्याच्यावरील कर्जही फेडलं.

हुआंगच्या परिवारातील लोकांना संशय आला. त्यांनी हुआंगला सतर्क केलं. कारण झांग पैसे परतही करत नव्हता. अशात त्याला न सांगता हुआंग हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि तिथे तिला समजलं की, तो तिथे कामच करत नाही. आता हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. तेव्हा कुठे सत्य समोर आलं. आता तरूणाला फसवणुकीसाठी ११ वर्ष शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Web Title: Man poses as doctor dupes girlfriend scooped out 3 crore rupees in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.