पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवताना 50 वर्षीय व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट मोडला, लघवी येणंही झालं बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 03:53 PM2022-08-04T15:53:33+5:302022-08-04T15:53:47+5:30
डॉक्टरांना आढळलं की, व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टच्या चारही बाजूने ऊतक, ब्लड वेसेल्स आणि नसा डॅमेज झाल्या आहेत. दरम्यान डॉक्टरांनी फार काळजीपूर्वक त्याच्या प्रायव्हेट पार्टवर उपचार केले.
पत्नीसोबत रोमान्स करताना 50 वर्षीय व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाला. वेदनेने तो हैराण झाला. प्रायव्हेट पार्टमधून रक्त येऊ लागलं होतं. इतकंच नाही तर त्याची यूरिन पास होणंही बंद झालं होतं. त्यानंतर व्यक्ती कसातरी हॉस्पिटलमध्ये पोहोचला. जिथे त्याची सर्जरी करण्यात आली. ही घटना इंडोनेशियाची आहे. International Journal of Surgery Case Report मध्ये या केसचा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे.
रिपोर्ट्सनुसार, व्यक्ती डॉक्टरांकडे प्रायव्हेट पार्टमध्ये होत असलेल्या वेदनेची समस्या घेऊन गेला होता. अशात इंडोनेशियातील जावाच्या Dr. Soetomo General हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी इमरजन्सीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू केले. जिथे समजलं की, तो Eggplant Deformity ने ग्रस्त आहे.
डॉक्टरांना आढळलं की, व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टच्या चारही बाजूने ऊतक, ब्लड वेसेल्स आणि नसा डॅमेज झाल्या आहेत. दरम्यान डॉक्टरांनी फार काळजीपूर्वक त्याच्या प्रायव्हेट पार्टवर उपचार केले. पाच दिवस हॉस्पिटलमध्ये घालवल्यानंतर व्यक्ती बरी झाली. उपचारानंतर चार महिन्यांपर्यंत व्यक्ती काहीच समस्या झाली नाही. आता तो कोणत्याही समस्येविना आधीसारखं जीवन जगत आहे.
डॉक्टर म्हणाले की, Penile Fracture एका असामान्य बाब आहे. अशा काही केसेस समोर येत असतात. डॉक्टरांनी सांगितलं की, अडचणींपासून वाचण्यासाठी अशा स्थितीत लवकरात लवकर सर्जरी केली गेली पाहिजे. 24 तासांच्या आत सर्जरी करावी.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, 1924 पासून आतापर्यंत जगभरात Penile Fracture च्या 2 हजार केसेस समोर आल्या आहेत. म्हणजे दरवर्षी 16 केसेस. वैज्ञानिक म्हणाले की, काही केसेसमध्ये अर्ध्यात Penile Fracture झाल्यानंतर एक क्रॅंकिंड साउंड ऐकायला येतो. अनेकदा Penile Fracture नंतर रूग्ण Erectile Dysfunction संबंधी समस्यांचे शिकार होतात.