कमालच! मालकाने श्वानासाठी खरेदी केली १४ लाख रूपयांची सुटकेस, बघा आत काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 02:52 PM2024-11-28T14:52:59+5:302024-11-28T15:02:27+5:30
Dog Suitcase : तुम्हाला जर कुणी सांगितलं की, एका व्यक्तीने त्याच्या श्वानासाठी तब्बल १४ लाख रूपयांची सुटकेस आणली. तर यावर तुमचा सहजासहजी विश्वास बसणार नाही.
Dog Suitcase : अनेक लोकांना श्वानांची आवड असते. बरेच लोक श्वानांवर घरातील सदस्यांप्रमाणे प्रेम करतात, त्यांची काळजी घेतात. पाळीव श्वानासाठी वेगवेगळ्या गोष्टींवर खर्चही केला जातो. मात्र, तुम्हाला जर कुणी सांगितलं की, एका व्यक्तीने त्याच्या श्वानासाठी तब्बल १४ लाख रूपयांची सुटकेस आणली. तर यावर तुमचा सहजासहजी विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, मालकासाठी त्याचा श्वास किती महत्वाचा आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे.
अजय ठाकोर नावाची एक व्यक्ती सोशल मीडियावर चर्चेत आली. कारण त्याने त्याच्या श्वानासाठी तब्बल १४ लाख रूपयांची लुई वुइटन सुटकेस खरेदी केली. अजय ठाकोर हे डॉक्टर मल्टिमीडियाचे सीईओ आणि संस्थापक आहेत. त्यांनी ही लक्झरी बॅग आपल्या श्वानासाठी खरेदी केली. या सुटकेसचं नाव 'बोन ट्रंक' असं आहे. कारण सुटकेस हड्डीच्या आकाराची दिसते. सुटकेसमध्ये दोन मोठ्या वाट्या आहेत आणि एक लाकडी ट्रे सुद्धा आहे. जेणेकरून श्वानाचा प्रवास आरामदायक व्हावा. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक बघून अवाक् झाले आहेत.
हा व्हिडीओ acerogersceo नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून याच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'एस्पेन नेहमी असे पैसे खर्च करतो की, उद्याचा दिवस जणू उजाडणारच नाही'. व्हिडिओला आतापर्यंत ३३ लाखांपेक्षा अधिक वेळा बघण्यात आला आहे. तेच ४७ हजारापेक्षा जास्त लोकांनी लाइफ केला आहे. व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, '१४ लाखात तर एक माणूस स्वत:साठी चांगलं घर खरेदी करू शकतो. पण हा कुत्रा तर लक्झरीमध्ये फिरणारा वाटतोय. या कुत्र्याकडे त्याचा पॅलेस आहे आणि आपण सगळे त्याच्या कार पार्किंगमध्ये उभे आहोत'.